पीएमसी इतिहासजमा; युनिटी स्मॉल फायनान्स बँकेशी ग्राहकांचे नवे नाते, विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे पाप तिच्यासोबतच इतिहासजमा झाले. या बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण करण्यात आले आहे. नवीन बँकेशी जुन्या ग्राहकांचे नाते कायम राहिल. 5 लाखांपर्यंतची रक्कम देण्याची हमी नवीन बँकेने घेतली आहे. तसेच त्यापुढील रक्कम पुढील 3 ते 10 वर्षांत ही रक्कम परत करण्यात येईल.

पीएमसी इतिहासजमा; युनिटी स्मॉल फायनान्स बँकेशी ग्राहकांचे नवे नाते, विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण
pmc bank
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 10:39 AM

मुंबई : संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेचे नाव इतिहासजमा झाले आहे. अनेकांची ही बँक जिव्हाळ्याची होती. आधुनिक यंत्रणा वापरुन या बँकेने कोट्यवधी उलाढाल असणा-या व्यक्तिगत संस्था आणि सार्वजनिक संस्थांना त्यांच्याकडे आकर्षित केले होते. या बँकेत अनेक मोठ्या फर्मचे व्यवहार होते. अगदी निमशहरी भागातही या बँकेच्या शाखा होत्या. पण व्यवहारातील पारदर्शकता हरविलेल्या या बँकेला संचालकांच्या निर्णयाचा फटका बसला. सुमारे अडीच वर्षांपूर्वी आर्थिक अनियमिततेचे प्रकरण समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने (RBI) पीएमसी बँकेचे बोर्ड बरखास्त केले होते. सरकारने मंगळवारी विलीनीकरणाची योजना अधिसूचित केली. संकटात सापडलेल्या पीएमसी बँकेचं (PMC Bank) नाव बदलले. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली.तणावग्रस्त पीएमसी बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये (Unity Small Finance Bank) विलीनीकरण 25 जानेवारी रोजी पूर्ण झाले. यामुळे पीएमसी बँकेच्या शाखा आता युएसएफबीच्या शाखा म्हणून काम करणार आहेत. रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. केंद्रीय बँकेने सांगितले की पीएमसी बँकेच्या शाखा मंगळवारपासून यूएसएफबीएलच्या शाखा म्हणून काम करू लागल्या आहेत. आता ग्राहकांच्या पैशांचं काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही बातमी पूर्ण वाचा.

मंगळवारी शिक्कामोर्तब

सुमारे दोन वर्षांपूर्वी आर्थिक अनियमिततेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त केले होते. रिझर्व्ह बँकेने विलीनीकरणाच्या योजनेचा मसुदा तयार केला होता, जो 22 नोव्हेंबर 2021 रोजी सार्वजनिक करण्यात आला होता. सरकारने या मंगळवारी विलीनीकरणाची योजना अधिसूचित केली. यूएसएफबीएल बँक पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वांसह त्याअंतर्गत ठेवी अधिग्रहित करेल. USFBL या योजनेतील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती व्यवस्था करत आहे.

2019 मध्ये हा घोटाळा आला उघडकीस

पीएमसी बँकेतील बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. 2019 मध्ये या घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली होती. सप्टेंबर 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने बँकेवर कडक निर्बंध घातले होते. 23 सप्टेंबर 2019 रोजी पासून या बँकेवर केंद्रीय बँकेची स्थगिती कायम आहे. याअंतर्गत बँकेच्या ठेवीदारांना पैसे काढण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेचे बोर्ड बरखास्त केले होते.

दमदार खेळाडुच्या हाती सूत्रे

रिझर्व्ह बँकेने विलीनीकरणाचा आराखडा तयार केला होता आणि तो 22 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. सूचना व हरकती मागविण्यात आल्या. टिप्पण्या सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर होती.रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केल्याप्रमाणे, विलीनीकरणाच्या मसुद्याच्या योजनेंतर्गत, यूएसएफबी बँक पीएमसी बँकेच्या मालमत्ता आणि दायित्वांसह ठेवी अधिग्रहित करेल. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना अधिक संरक्षण मिळणार आहे. यूएसएफबीची निर्मिती 1,100 कोटी रुपयांच्या भांडवलासह करण्यात आली आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड हा सेंट्रम ग्रुप आणि भारतपे यांचा संयुक्त उपक्रम आहे. या बँकेने 1 नोव्हेंबर 2021 रोजी स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाजास सुरुवात केली आहे.

गुंतवणुकदारांचा जीव भांड्यात

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांचे जमा केलेले भांडवल येत्या 3 ते 10 वर्षांत परत करण्यात येणार आहे. DICGC अंतर्गत युनिटी स्मॉल फायनान्स बँक ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची हमी रक्कम परत करणार आहे. 5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास दोन वर्षांत अतिरिक्त 50 हजार रुपये, 3 वर्षांच्या आत एक लाख रुपयांपर्यंत, 4 वर्षांच्या आत 3 लाख रुपये, 5 वर्षांच्या आत 5.5 लाख रुपये आणि 10 वर्षांच्या आत याहून अधिक रक्कम ग्राहकांना परत देणार आहे.

News Keywords:

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.