नवी दिल्ली : या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये बँकेच्या धोरणात (Bank Policy) अनेक बदल होत आहे. या महिन्यात पैशांबाबत बदल होणार आहे. या बदलांचा तुमच्यावर परिणाम होईल. या महिन्यात केंद्रीय बँकेने (RBI) डिजिटल रुपयाचा पायलट प्रकल्प सुरु केला आहे. तर वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर वाढू शकतात. डिसेंबरमध्ये पतधोरण समितीची (MPC) बैठक होणार आहे. त्यात रेपो रेट (Repo Rate) वाढण्याची शक्यता आहे.