PPF Account Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत का? असे करा विलीन

पोस्ट विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये एकाधिक PPF खाती असण्याची आणि एकाधिक PPF खाती एकाच PPF खात्यात विलीन करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले होते. परिपत्रकानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ठेवीदाराने एकापेक्षा जास्त PPF खाते उघडले, तेव्हा दुसरे आणि त्यानंतरचे खाते अनियमित मानले जाते, कारण एखादी व्यक्ती PPF योजनेंतर्गत फक्त एकच खाते उघडू शकते.

PPF Account Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती आहेत का? असे करा विलीन

नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीचा चांगला मार्ग आहे. त्यात गुंतवलेल्या रकमेवर करमाफी, मुदतपूर्तीवर करमुक्त परतावा आणि सरकारचं संरक्षण हे प्रमुख कारण आहे. सध्या पीपीएफवर वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे. पीपीएफ खात्याशी संबंधित नियम कडक आहेत. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

तर दुसरे आणि त्यानंतर उघडलेले खाते अनियमित मानले जाते

जर एखाद्या ठेवीदाराने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील, तर दुसरे आणि त्यानंतर उघडलेले खाते अनियमित मानले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये पीपीएफमध्ये काही सूट दिली जाते. वित्त मंत्रालय अशा अनियमित खाती/ठेवींना एका खात्यात एकापेक्षा जास्त PPF खाते विलीन करून नियमित करते.

टपाल विभागाने विलीनीकरणाची प्रक्रिया सांगितली

पोस्ट विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले, ज्यामध्ये एकाधिक PPF खाती असण्याची आणि एकाधिक PPF खाती एकाच PPF खात्यात विलीन करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितले होते. परिपत्रकानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ठेवीदाराने एकापेक्षा जास्त PPF खाते उघडले, तेव्हा दुसरे आणि त्यानंतरचे खाते अनियमित मानले जाते, कारण एखादी व्यक्ती PPF योजनेंतर्गत फक्त एकच खाते उघडू शकते. अशा परिस्थितीत जर अनवधानाने दोन पीपीएफ खाती उघडली गेली असतील, तर एक खाते दुसऱ्यामध्ये विलीन करा. हे आवश्यक आहे कारण पीपीएफ खाते मुदतपूर्तीपूर्वी बंद केले जाऊ शकत नाही. या प्रकरणात तुम्हाला फक्त विलीन करण्याचा पर्याय मिळेल.

ठेवीदाराकडे हा पर्याय असेल?

गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडीचे पीपीएफ खाते ठेवण्याचा पर्याय असेल. यासाठी अट अशी आहे की, दोन्ही खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम विहित ठेव मर्यादेत असावी. सध्या ते प्रति व्यवसाय वर्षाला दीड लाख रुपये आहे. तुमच्याकडे वेगवेगळ्या बँकांमध्ये एकापेक्षा जास्त पीपीएफ किंवा पोस्ट ऑफिसमध्ये दोन खाती असल्यास पीपीएफ खाते हस्तांतरण प्रक्रियेचा वापर करून सहजपणे विलीन केले जाऊ शकते.

पीपीएफ खाते उघडण्याचे नियम

15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह हे खाते कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडले जाऊ शकते. परंतु एखादी व्यक्ती त्याच्या नावावर एकच पीपीएफ खाते उघडू शकते. मग ते बँकेत उघडलेले असो वा पोस्ट ऑफिसमध्ये असो.

संबंधित बातम्या

DL, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि रेशन कार्डसह ‘या’ कामांसाठी आता कोविड सर्टिफिकेट आवश्यक

नवीन वर्षात स्वस्त कपडे महागणार, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवर जीएसटी वाढवला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI