ऑनलाईन विमा खरेदीला पंसती; वर्षभरात ग्राहकांची संख्या दुपटीने वाढली

| Updated on: Nov 19, 2021 | 6:26 PM

ऑनलाईन पद्धतीने विमा पॉलिसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ग्राहक कोणत्याही मध्यस्थाशिवाय विमा पॉलिसीच्या खरेदीला पसंती देत आहेत.

ऑनलाईन विमा खरेदीला पंसती; वर्षभरात ग्राहकांची संख्या दुपटीने वाढली
Follow us on

नवी दिल्ली – ऑनलाईन पद्धतीने विमा पॉलिसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ग्राहक कोणत्याही मध्यस्थाशिवाय विमा पॉलिसीच्या खरेदीला पसंती देत आहेत. यातून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन विमा पॉलिसीची विक्री होत असून, जीडीपीमध्ये देखील ऑनलाईन विमा पॉलिसीच्या खरेदीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा टक्का वाढला आहे. बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशनकडून नुकताच याबाबत एक सर्व्हे सादर करण्यात आला आहे.

56 टक्के ग्राहक 18 ते 40 वयोगटातील

या सर्व्हेनुसार दिवसेंदिवस ऑनलाईन पद्धतीने विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. ऑनलाईन विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी 56 टक्के लोक हे 18 ते 40 वर्ष वयोगटातील आहेत. 14 टक्के लोक हे 41ते 60 वयोगटातील आहेत. तर उर्वरीत ग्राहक हे 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील आहेत. विशेष: कोरोना कालखंडामध्ये ऑनलाईन विमा खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देखील या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

विम्याच्या ऑनलाईन खरेदीत दुपटीने वाढ 

याबाबत बोलताना मॅक्स लाईफ विमा कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,  विमा क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने विमा खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुठल्याही मध्यस्थाशिवाय विमा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात 12.5 टक्के लोकांनी ऑनलाईन पद्धतीने विमा खरेदी केला होता. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 30 टक्क्यांच्या आसपास ग्राहकांनी ऑनलाईन विमा खरेदी केला आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये त्यात दुपटीची वाढ झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे सरासरी वय 36 असल्याची माहितीही यावेळी संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

ऑनलाईन विमा खरेदीबाबत ग्राहकांना शंका 

दरम्यान सध्या ऑनलाईन विमा खरेदीचा कल जरी वाढत असला, तरी देखील आजूनही विमा पॉलिसी खरेदी करू इच्छिणारे  अनेक ग्राहक हे ऑनलाईन विमा खरेदीच्या पद्धतीबाबत साशंक असल्याचे या सर्व्हेमध्ये  म्हटले आहे. यातील अनेक ग्राहकांनी ऑनलाई विमा खरेदीबाबत माहिती घेतली, मात्र त्यानंतर त्यांनी ऑफलाईन पद्धतीनेच विमा खरेदीला प्राधान्य दिल्याचे सर्व्हेमधून समोर आले आहे.

संबंधित बातम्या 

Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; आता मागवता येणार ऑनलाइन औषधे

हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये; प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ

फक्त 500 रुपयांमध्ये तुम्ही उघडू शकता ‘हे’ खाते, चांगल्या परताव्यासह सुरक्षेचा लाभही मिळेल