AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय महिलेने घडवला इतिहास! प्रिया नायर यांची कमाल, Rin, हॉर्लिक्स, लक्सच सांभाळणार कारभार

Hindustan Uniliver Limited : उद्योग जगतातून मोठी घडामोड समोर येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीत खांदेपालट झाली आहे. कंपनीच्या इतिहासात MD आणि सीईओ पदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी लागली आहे. प्रिया नायर यांनी इतिहास घडवला आहे. कोण आहेत त्या?

भारतीय महिलेने घडवला इतिहास! प्रिया नायर यांची कमाल, Rin, हॉर्लिक्स, लक्सच सांभाळणार कारभार
प्रिया नायर नवीन एमडीImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 11, 2025 | 10:38 AM
Share

भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कंपनीने पहिल्यांदाच MD आणि सीईओ पदी पहिल्यांदाच महिलेची वर्णी लागली आहे. प्रिया नायर यांनी इतिहास घडवला आहे. नायर या 1 ऑगस्ट 2025 रोजी पदाचा कारभार स्वीकारतील. सध्याचे एमडी रोहित जावा यांचा कार्यकाल अत्यंत कमी राहिला. ते दोन वर्षांपासून या पदावर होते. HUL च्या इतिहासात त्यांचा कार्यकाळ कमी होती. त्यांच्यानंतर आता कंपनीने प्रिया नायर यांची या उच्च पदावर नियुक्ती करण्याची घोषणा केली.

कोण आहेत प्रिया नायर?

प्रिया नायर यांनी 1995 मध्ये HUL मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कंपनीत होम केअर, ब्युटी अँड पर्सनल केअर आणि वेलबीईंग पोर्टफोलियोत अनेक पदावर काम केले आहे. सध्या त्या युनिलिव्हिरच्या ग्लोबल टीममध्ये आहेत. त्या ब्युटी अँड वेलबीईंग बिझनेस ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. कंपनीचे हे युनिट जवळपास 12 अब्ज युरोची उलाढाल करते. यामध्ये हेअर केअर, स्कीन केअर, हेल्थ सप्लीमेंट्स आणि प्रिमियम ब्युटी प्रोडक्ट्स यांचा समावेश आहे.

भारतीय बाजारावर पकड

HUL चे चेअरमन नितीन परांजपे यांनी प्रिया नायर यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी कंपनीत चांगले काम केले आहे. त्यांना भारतीय बाजाराची चांगली समज आहे. त्यांच्या नेतृत्वात कंपनी मोठी झेप घेईल असा विश्वार परांजपे यांनी व्यक्त केला. महिलेकडे कंपनीची धुरा देण्याच्या या निर्णयाचे उद्योग जगतातून स्वागत होत आहे. नायर यांच्यामुळे कंपनी मोठी प्रगती करेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

कंपनीची दमदार कामगिरी

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ही भारतातील सर्वात मोठी फास्ट-मव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीची उलाढाल 60,680 कोटी रुपये इतकी होती. बाजारातील कंपनीचे भांडवल 5.69 लाख कोटींहून अधिक आहे. कंपनीकडे 50 हून अधिक ब्रँड्स आहेत. यामध्ये लक्स, लाईफबॉय, सर्फ एक्सेल, रिन, व्हील, डव, व्हॅसलीन, पाँड्स लॅक्मे, क्लीनिक प्लस, ब्रुक बाँड, हॉर्लिक्स आणि किसान यासारख्या ब्रँडचा समावेश आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.