AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….तर घरे 10 ते 15 टक्क्यांनी महागणार; ‘क्रेडाई’चा इशारा

घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येणाऱ्या काळात घरांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI)च्या  वतीने देण्यात आला आहे.

....तर घरे 10 ते 15 टक्क्यांनी महागणार; 'क्रेडाई'चा इशारा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 18, 2021 | 7:20 AM
Share

मुंबई – घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येणाऱ्या काळात घरांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI)च्या  वतीने देण्यात आला आहे. याबाबत बोलताना क्रेडाईने म्हटले आहे की, घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. विशेष: सिमेंट आणि आणि स्टीलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ जर अशीच सुरू राहिली तर येणाऱ्या काळात घरांच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतात. 

सरकारने दर नियंत्रणासाठी प्रयत्न करावा 

घरांच्या किमती वाढल्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसू  शकतो, तसेच कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असल्यामुळे विकासकांचा देखील तोटा होत आहे. सरकारने बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न कारावा. कच्च्या मालावरील जीएसटी कमी केल्यास दर नियंत्रणात येऊ शकतात. अशी मागणी  क्रेडाईच्या वतीने करण्यात आली आहे. जानेवारी 2020 पासून कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक बांधकाम प्रकल्प रखडले आहेत. मात्र आता कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने या प्रकल्पाचा खर्च देखील वाढला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा संबंधित विकासाला बसला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. 

प्रकल्प रखडल्याने बांधकाम व्यवसायिक संकटात 

संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत, येणाऱ्या काळात देखील त्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारने बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात न आल्यास येणाऱ्या काळात घराच्या किमती या दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढू शकतात.  याचा सर्वाधिक भार हा ग्राहकांवर पडणार आहे. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकल्प रखडल्याने विकासकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या 

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी करताय मग ही बातमी वाचा

बचतीचा सोपा मार्ग! ‘इथे’ करा गुंतवणूक; 21 वर्षांमध्ये मिळवा 1 कोटी रुपये

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?