AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata : अपमानाची सव्याज परतफेड..रतन टाटा यांनी कृतीतून शिकविला फोर्डच्या मालकाला कायमचा धडा..

Tata : अपमान करणाऱ्या फोर्डच्या मालकाला रतन टाटांनी दिले असे उत्तर की..

Tata : अपमानाची सव्याज परतफेड..रतन टाटा यांनी कृतीतून शिकविला फोर्डच्या मालकाला कायमचा धडा..
रतन टाटा यांनी दिले कृतीतून उत्तरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 08, 2022 | 3:01 PM
Share

नवी दिल्ली : मोठं-मोठे उद्योजक, तरुण, वृद्ध, भारतातील सर्वच लोकांपुढे रतन टाटा (Ratan Tata) यांचा आदर्श आहे. टाटा या ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे. उद्योगविश्वात (Business) त्यांच्या कार्याचा दबदबा आहे. पण याचा अर्थ असा नाही की, टाटांना कधीच अपमानाचा सामना करावा लागला नाही. त्यांच्या आयुष्यातही अपमानाचे प्रसंग आले, पण त्यांनी या अपमानाचा बदला (Revenge) घेतला. त्यांनी कृत्तीतून दिलेल्या उत्तरातून आदर्श घालून दिला.

भारतातील मोठे उद्योजक आणि RPG एंटरप्रायझेससचे संचालक हर्ष गोयनका (Harsh Goenka) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला. त्यात रतन टाटा (Ratan Tata) यांनी फोर्ड कंपनीकडून (Ford Company) झालेल्या अपमानाचा बदला कसा घेतला याची माहिती दिली आहे.

तर ही गोष्ट आहे, 1990 सालमधील. त्यावेळी टाटा मोर्टसने त्यांचा कार उत्पादन करणारा विभाग विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी फोर्ड कंपनीशी त्यांची चर्चा सुरु होती. फोर्डच्या मालकाने या चर्चेदरम्यान त्यांचा अपमान केला.

या घटनेनंतर रतन टाटा यांनी त्यांचा कार उत्पादन युनिट विक्रीचा निर्णय टाळला. पुढे त्यांनी जगातील सर्वात लक्झरियस कार निर्माता कंपनी फोर्डला कायमचा धडा शिकविला. त्याची ही प्रेरक कहाणी..

1990 साली टाटा कंपनीने टाटा इंडिका हे चारचाकी वाहन बाजारात उतरविले होते. पण ते बाजारात काही चमक दाखवू शकले नाही. त्यानंतर टाटांनी कार डिव्हिजन विक्रीचा निर्णय घेतला.

19999 साली या विक्रीसंदर्भात त्यांनी फोर्ड मोटर्सचे चेअरमन Bill Ford यांच्याशी चर्चा सुरु केली. पण येथूनच टाटा समुहाने कार विक्रीची गरुडझेप घेतली. येथील अपमानाची टाटांनी अवघ्या काही वर्षातच फोर्ड यांना सव्याज परतफेड केली.

“तुम्हाला काहीच माहिती नाही. तुम्ही कशाला पॅसेंजर कार डिव्हिजन सुरु केले. जर ही सौदा पूर्ण झाला तर टाटा समुहावर हे माझे मोठे उपकार असतील.” फोर्ड कंपनीच्या मालकाचे हे बोल टाटांच्या जिव्हारी लागले.

टाटांनी यावर तात्काळ काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांनी कार विभाग विक्री करण्याचा निर्णय रद्द केला. Tata Motors ने या घटनेच्या अघव्या 9 वर्षांनी म्हणजे 2008 साली विक्रीत सर्वात मोठी झेप घेतली.

एकीकडे टाटा मोटर्स विक्रीत इतिहास रचत असताना, फोर्ड कंपनीची स्थिती मात्र खालावली. ‘समय बडा बलवान होता है’ असं म्हणतात. टाटा यांनी फोर्डच्या Jaguar आणि Land Rover हे ब्रँड खरेदीचा प्रस्ताव ठेवला.

“आपण Jaguar आणि Land Rover खरेदी करता आहात. आपले खूप धन्यवाद. आपले आमच्यावर मोठे उपकार झाले.” फोर्डच्या मालकाने सौद्या पूर्ण झाल्यानंतर हे गौरवोद्गार काढले.

सौद्यासाठी फोर्ड स्वतः त्यांच्या संपूर्ण टीमसह मुंबईत टाटा यांना भेटायला आले होते. टाटांनी अपमानाचा असा बदला घेतला. या व्हिडिओमुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. टाटांनी कृतीतून फोर्डला दिलेले उत्तर सर्वांसाठी एक आदर्श ठरले आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.