AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटा मोटर्सनी घेतला दरवाढीचा निर्णय; कारच्या किंमती आताच जाणून घ्या, कोणती कार कितीने महाग झाली…

प्रवासी वाहनांच्या किंमती 0.55 टक्क्यांनी वाढवल्या होत्या तर एप्रिल 2022 मध्ये 1.1 टक्के वाढ झाली.

टाटा मोटर्सनी घेतला दरवाढीचा निर्णय; कारच्या किंमती आताच जाणून घ्या, कोणती कार कितीने महाग झाली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 07, 2022 | 9:56 PM
Share

नवी दिल्लीः सध्या महागाईचा फटका सगळ्याच क्षेत्राना बसला आहे. त्यामुळे देशात अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे आता जर तुम्ही कार खरेदी करण्याची तयारी करत असाल आणि तुम्हाला भारतातील टाटा मोटर्सचे कोणतेही मॉडेल खरेदी करायचे असेल तर मात्र ही बातमी तुमच्यासाठी धक्का देणारी ठरणार आहे. टाटा कार खरेदी करणे आता सोमवार 7 नोव्हेंबरपासून महाग झाले आहे.

कंपनीने Tiago, Harrier, Nexon आणि Safari यासह सर्व प्रवासी वाहनांच्या किंमती वाढवल्या असून त्यामध्ये 0.9 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

टाटा मोटर्सने नुकतीच आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे मंगळवारपासून वाढलेल्या किंमती आता लागू करण्यात आल्या आहेत.

याचा अर्थ आता टाटा कार घेण्यासाठी तुमच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. खर्चाच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगत ही किंमत वाढवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. Safari, Harrier, Altroz, Nexon, Tiago आणि Tigor सारख्या कारच्या किंमती वाढ करण्यात आली आहे.

टाटा कंपनीच्या वाहनांच्या किमतीत यावर्षी झालेली ही पहिलीच वाढ नसून याआधीही तीनदा वाढ करण्यात आली आहे. जुलै 2022 मध्येदेखील टाटा मोटर्सने खर्च वाढला असल्याचे कारण देण्यात आले होते.

प्रवासी वाहनांच्या किंमती 0.55 टक्क्यांनी वाढवल्या होत्या तर एप्रिल 2022 मध्ये 1.1 टक्के वाढ झाली. जानेवारी 2022 मध्ये कंपनीकडून विविध मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किंमतीतही 0.9 टक्क्यांनी वाढ केली आहे.

टाटा मोटर्सने आपल्या सर्वात स्वस्त टियागोच्या विविध व्हेरियंटच्या किमतीत सुमारे 6,400 ते 8,800 रुपयांची वाढ केली आहे.

टाटा नेक्सॉनच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या मॉडेलची किंमत सुमारे 15,000 रुपयांनी वाढवली आहे. तर त्याच वेळी, Nexon Electric (Nexon EV) च्या किंमतीत सुमारे 19,000 रुपयांनी वाढ केली आहे.

टाटा मोटर्सची एसयूव्ही हॅरियर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला आता 26,000 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर टाटा सफारी 27 हजार रुपयांनी महागली असून इतर मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या खिशावर बोजा वाढवण्याच्या घोषणेनंतरही, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 1.22 टक्क्यांच्या वाढीसह 430.50 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. ट्रेडिंगच्या सुरुवातीला टाटाच्या शेअर्सने 433.85 रुपयांची पातळी गाठली होती.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?