Godrej-Raymond Deal : कामसूत्र-पार्क अव्हेन्यूची नवीन मालकीण कोण? संभाळते 97,000 कोटींचा व्यवसाय

Godrej-Raymond Deal : गोदरेजने रेमंड कंपनीकडून कामसूत्र-पार्क अव्हेन्यूची खरेदी केली आहे. या ब्रँडची नवीन मालकीण कोण आहे, माहिती आहे का?

Godrej-Raymond Deal : कामसूत्र-पार्क अव्हेन्यूची नवीन मालकीण कोण? संभाळते 97,000 कोटींचा व्यवसाय
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 5:36 PM

नवी दिल्ली : भारतातील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये 2825 कोटी रुपयांची डील झाली आहे. गोदरेज समूहाने रेमंड कंझ्युमर केअर कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या करारामुले आता रेमंडचा (Raymond) कामसूत्र, पार्क अव्हेन्यू सारखे ब्रँड गोदरेज केअरचा हिस्सा असतील. एफएमसीजी क्षेत्रातील (FMCG Sector) ही मोठी डील मानण्यात येते. कंझ्युमर बेस्ड प्रोडक्ट तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्सचा (Godrej Consumer Products) समावेश आहे. ही कंपनी रेमंड कंझ्युमर केअरचे अधिग्रहण करेल. यामुळे एफएमसीजी सेक्टरमध्ये गोदरेजचा दबदबा वाढणार आहे. आता या नवीन व्यवसायाची धूरा गोदरेज कुटुंबातील ही महिला सांभाळणार आहे.

निसाबा गोदरेज रेमंडची डील अंतिम करण्यात निसाबा गोदरेज (Nisaba Godrej) यांची महत्वाची भूमिका होती. गोदरेज समूहाचे संचालक आदि गोदरेज (Adi Godrej) यांची निसाबा मुलगी आहे. त्या 2017 पासून गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची (GCPL) जबाबदारी संभाळत आहेत. निसाबा यांच्याकडे उद्योजकाचे सर्व गुण आहेत. त्यांनी कामकाज हाती घेताच, समूहाचा विस्तार अति गतिने झाला. 2017 पासून गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सातत्याने विस्तार करत आहे.

शिक्षणातही डंका निसाबा यांचा जन्म मुंबईत 1978 साली झाला. निसाबा लहानपणापासूनच तल्लख होत्या. त्यांचे शालेय जीवन मुंबईत गेले. त्यानंतर त्यांनी वॉर्टन स्कूल ऑफ द युनिर्व्हसिटी ऑफ पेन्सिलवेनियामधून BSC चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून MBA ची पदवी मिळवली. त्यानंतर 2017 पासून त्यांनी गोदरेज समूहात लक्ष देण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

कल्पेश मेहतासोबत लग्न वर्ष 2013 मध्ये त्यांनी ट्रायबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांच्याशी लग्न केले. कुटुंब आणि व्यावसायचं त्यांनी चांगलं संतुलन साधलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. जोरान आणि ऐडन अशी त्यांची नावं आहेत. त्या कुटुंबासाठी पण वेळ काढतात आणि त्यांनी कंपनीच्या विकास आणि विस्तारातही पुढाकार घेतला आहे.

कंपनीचा जोमात विस्तार 2008 मध्ये Godrej Agrovet संचालक मंडळात त्यांची एंट्री झाली. 2017 मध्ये त्यांनी गोदरेज समूहाची कमान हाती घेतली. त्यांनी कंपनीचे कामकाज हातात घेतले त्यावेळी कंपनीचे मूल्य होतं, 9600 कोटी रुपये. आज गोदरेज कंपनीचे मूल्य 97,525 कोटी रुपये आहे. एका अहवालानुसार, निसाबा यांचे नेटवर्थ 2022 यावर्षी 1200 कोटी रुपये होते.

4 कंपन्यांची जबाबदारी मीडिया रिपोर्टनुसार, निसाबा यांच्याकडे गोदरेजच्या 4 कंपन्यांची जबाबदारी आणि शेअर आहेत. त्यांचे नेटवर्थ जवळपास 1200 कोटी रुपये आहे. पगार म्हणून त्यांना 1.70 कोटी रुपये मिळतात. सर्वात तरुण चेअरमन म्हणून निसाबा यांनी कंपनीत सातत्याने अनेक बदल केले. त्यामुळे कंपनीने आगेकूच केली. त्यांनी व्यवसायाची धोरण बदलवली. नवीन उत्पादन तयार करणे, त्याचे मार्केटिंग, या उत्पादनांचा दबदबा तयार करणे असे काम त्यांनी सातत्याने केले. तसेच इतर ब्रँडही पंखाखाली घेण्यासाठी मोठी तयारी केली. सामाजिक कार्यात पण त्यांनी हिरारीने भाग घेतला.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.