कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला आहे. (RBI cancels licence of Subhadra Local Area Bank, Kohlapur)

कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवान रद्द केला आहे. सलग दोन तिमाहींमध्ये किमान नेटवर्थची मर्यादा पाळू न शकल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसंच बँकेच्या कार्य पद्धतीवर बोट ठेवून हा परवाना रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेचं लायसन्स रद्द केलं होतं. (RBI cancels licence of Subhadra Local Area Bank, Kohlapur)

सुभद्रा लोकल एरिया बँकेने 2019-2020 या आर्थिक वर्षातील दोन तिमाहीममध्ये किमान नेटवर्थच्या मर्यादेचं उल्लंघन केलं. तसेच बँकेकडे ठेवीदारांचे पैसे परत करण्याएवढीही रक्कम शिल्लक नसल्याने या बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. ज्या पद्धतीने बँकेचं काम सुरू होतं, त्यानुसार सध्याच्या घडीला आणि भविष्यात ग्राहकांचं मोठं नुकसान झालं असतं, असा ठपकाही बँकेने ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमुळे बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

बँकेला देवाण-घेवाण करता येणार नाही

सुभद्रा लोकल एरिया बँकेचं कामकाज 24 डिसेंबर रोजी संपल्यानंतर त्या क्षणापासून त्यांचं लायसन्स रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेला कोणतीही देवाण-घेवाण करता येणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटलं आहे.

उच्च न्यायालयात माहिती देणार

दरम्यान, रिझर्व्ह बँक सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या एकूण कामकाजाचा लेखाजोखा उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यामुळे बँकेची सध्याची पत आणि आर्थिक डबघाई अधिक स्पष्ट होणार आहे.

या नियमांतर्गत कारवाई

रिझर्व्ह बँकेने सुभद्रा एरिया लोकल बँकेवर बँक रेग्युलेटिंग अॅक्ट 1949च्या सेक्शन 22 (4) अंतर्गत ही कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे बँक नियमन कायदा ५ (ब) नुसार बँकेला यापुढे कसलाही व्यवहार करता येणार नाही.

1996 साली स्थापना

या बँकेची 1996 साली स्थापना झाली होती. उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसह नागरिकांच्या विकासाच्या हेतूने स्थापन झालेली ही बँक लवकरच लोकप्रियही झाली होती. स्थानिक लोकांना बँकिंगची, बचतीची सवय लागावी, त्यांच्या कर्जाच्या छोट्या छोट्या गरज लगोलग भागाव्यात अशा हेतूने लोकल एरिया बँकांचा जन्म झाला. थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली कारभार चाणारी ही राज्यातील पहिलीच स्थानिक बँक होती. तर देशातील ही चौथी बँक होती.

कर्नाटकपर्यंत शाखा

या बँकेची केवळ कोल्हापूरमध्येच शाखा नाही तर कर्नाटकपर्यंत बँकेचं जाळं पसरलेलं आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, बेळगाव आणि पुण्यातही बँकेच्या शाखा आहेत. सुभद्रा बँकेच्या कोल्हापुरात सुरुवातीला तीन शाखा कार्यरत होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून एक शाखाच कार्यरत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कराड जनता बँकेचाही परवाना रद्द झाला होता

मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर सातारा जिल्ह्यातील नावाजलेली ‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेचा परवाना रद्द केला होता. कराड जनता बँक ही सातारा जिल्ह्यात एक नावाजलेली बँक आहे. सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली होती. (RBI cancels licence of Subhadra Local Area Bank, Kohlapur)

 

संबंधित बातम्या:

मिनिटांत कर्ज देणाऱ्या अ‍ॅपमुळे अनेकांनी केली आत्महत्या, RBI ने केलं अलर्ट

आता पण चालू शकते 1, 2 आणि 5 रूपयांची नोट? जर तुमच्या जवळ या नोटा असतील तर पाहा नियम

एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे…

(RBI cancels licence of Subhadra Local Area Bank, Kohlapur)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI