AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिनिटांत कर्ज देणाऱ्या अ‍ॅपमुळे अनेकांनी केली आत्महत्या, RBI ने केलं अलर्ट

बर्‍याच अ‍ॅप्सच्या फसवणुकीवर त्रस्त झालेल्या ग्राहकांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अशा अ‍ॅप्समधून कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर सावध व्हा.

मिनिटांत कर्ज देणाऱ्या अ‍ॅपमुळे अनेकांनी केली आत्महत्या, RBI ने केलं अलर्ट
ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर
| Edited By: | Updated on: Dec 24, 2020 | 1:42 PM
Share

नवी दिल्ली : तुम्ही कर्ज घेण्यासाठी मोबाईलमध्ये ऑनलाईन कर्ज देणारे अ‍ॅप डाऊनलोड केले असतील तर सावधान. कारण भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना तात्काळ कर्ज देणाऱ्या अ‍ॅपबद्दल जागरुक राहण्यास सांगितलं आहे. बर्‍याच अ‍ॅप्सच्या फसवणुकीवर त्रस्त झालेल्या ग्राहकांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अशा अ‍ॅप्समधून कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर सावध व्हा. (reserve bank warned be cautious many people suicide trap instant loan apps)

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील 3 लोकांनी ऑनलाईन अ‍ॅपद्वारे फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सावध राहण्याचा इशारा आरबीआयकडून (RBI) देण्यात आला आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल काही मिनिटांत व्याज मिळेल असं अनेक कंपन्या आवाहन करत आहेत. पण त्यानंतर कर्ज वसूलीसाठी जबरदस्ती केली जात असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुरुग्राम आणि हैदराबादमधील चार कर्ज अॅप फायनान्स कार्यालयांवर हल्लीच छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये दोन कार्यालयं गुरुग्राम आणि दोन हैदराबादमध्ये आहेत. कंपनीविषयी तपास केला असता संपूर्ण फसवणुकीचं प्रकरण समोर आलं. यामध्ये एका चिनी नागरिकाचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. हैदराबादचे सह पोलीस आयुक्त अविनाश मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार कार्यालयांमध्ये कर्ज देणार 30 अॅप कार्यरत होते. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होत होती.

कंपनीच्या जाचाला कंटाळून तिघांची आत्महत्या

कर्ज फेडण्यासाठी कंपनीने केलेल्या जाचामुळे सॉफ्टवेअर इंजीनिअर, तेलंगानाची एक महिला एग्रिकल्चर ऑफिसर यांच्यासह 3 लोकांनी डिफॉल्ट केल्यामुळे शोषण करण्यात आल्यामुळे आत्महत्या केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे काही तास उशिरा पैसे दिल्यानंतरही त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार बर्‍याच लोकांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

काय म्हटले रिझर्व्ह बँकेने ?

केंद्रीय बँकेने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ‘मोबाइल अ‍ॅपद्वारे सामान्य लोकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा विवेकास्पद अॅपद्वारे होणाऱ्या फसवुकीचे बळी पडू नका. यासाठी खबरदारी म्हणून तुमचे केवासी कागदपत्रं कुठेही शेअर करू नका. बँकेची खासगी माहितीही शेअर करण्याआधी विचार करा. (reserve bank warned be cautious many people suicide trap instant loan apps)

संबंधित बातम्या –

Gold Price Today: ख्रिसमसच्या आधी सोनं आणखी झालं स्वस्त, वाचा आजचे दर

दिवसाला कमवाल 4000 रुपये, नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय

(reserve bank warned be cautious many people suicide trap instant loan apps)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.