रेपो रेटमध्ये कपात, तुमचा फायदा कसा होणार?

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो दरात दुसऱ्यांदा पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतरही अनेक कर्जांवर याचा चांगला परिणाम होईल. गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गृहकर्जदारांमध्ये …

, रेपो रेटमध्ये कपात, तुमचा फायदा कसा होणार?

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो दरात दुसऱ्यांदा पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची चिन्हं आहेत. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतरही अनेक कर्जांवर याचा चांगला परिणाम होईल. गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गृहकर्जदारांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या तीन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नव्हते. मात्र फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात केल्यानंतर आज पुन्हा एकदा ही कपात कायम ठेवली आहे.

आरबीआयच्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण आढावा बैठकीकडे देशाचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 पॉईंट्सची कपात करत कर्जदारांना दिलासा दिला. आरबीआयने यासह 2019-20 साठी जीडीपी अंदाज 0.2 टक्क्यांनी घटवला आहे.

आरबीआयने फेब्रुवारी महिन्यात 18 महिन्यांनी पाव टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर पुन्हा नव्या वर्षाच्या पहिल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात करत, कर्जदारांना दिलासा दिला.

तुमचा फायदा कसा होईल?

आरबीआयचा रेपो रेट कमी झाल्याने त्याचा फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांना मिळणार आहे. रेपो दर कपातीमुळे बँकांवर गृहकर्ज आणि वाहनकर्जावरील व्याजदर कमी करण्यासाठी दबाव असेल.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर किंवा रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने पैसा घेते तो दर. रेपो दर वाढल्यास, बँकांना रिझर्व्ह बँकांना वाढीव व्याजदराने पैसे द्यावे लागतात. त्याचा परिणाम म्हणून बँक आपल्या कर्जदारांचं व्याजदर वाढवते. त्यामुळे रेपो दरात कपात झाल्यास, बँकाही आपल्या कर्जदारांचं व्याजदर कमी करतात. रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळतात. त्यामुळे बँका कर्जदारांना पैसे देताना कमी दरात देऊ शकतात.

रिव्हर्स रेपो

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट. जशा बँका आरबीआयकडून कर्ज घेतात, तसं आरबीआयही बँकाकडून कर्ज घेतात, ठेवी ठेवल्या जातात. तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो दर होय. रेपो दरामध्ये बदल झाल्यानंतर तोच दर रिव्हर्स रेपो दराला लागू होतो.

संबंधित बातम्या

1 एप्रिलपासून नवीन नियम लागू, घर खरेदी स्वस्त  

1 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात ‘हे’ बदल होणार 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *