AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युपीआय पेमेंटप्रमाणे सोपे होणार कर्ज घेणे, आरबीआयकडून नवीन प्रणाली

rbi governor shaktikanta das: कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा आधार, ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी, पॅन प्रमाणीकरण आणि अकाउंट एग्रीगेटरसह विविध स्त्रोतांकडून ULI अ‍ॅप डेटा संकलित करेल. तसेच दुग्ध सहकारी संस्थांकडील दुधाचा डेटा यासारख्या सेवांशी देखील जोडले जाईल.

युपीआय पेमेंटप्रमाणे सोपे होणार कर्ज घेणे, आरबीआयकडून नवीन प्रणाली
shaktikanta das
| Updated on: Aug 27, 2024 | 5:10 PM
Share

गृहकर्ज असो की पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे कागदपत्रे द्यावी लागतात. अनेक दिवस बँकांच्या चकरा माराव्या लागतात. परंतु आता या सर्व प्रक्रियेतून सुटका मिळणार आहे. कर्ज घेणे सोपे होणार आहे. अगदी युपीआय पेमेंट करण्यासारखा हा प्रकार होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नवीन प्रणाली आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. युनिफाइड लँडिंग इंटरफेस (ULI) असा नवीन प्लॅटफॉर्म त्यासाठी आणला गेला आहे.

आरबीआयने मागील वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये फ्रिक्शनलेस क्रेडिट सहज कर्ज देण्यासाठी टेक्निकल प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला होता. आरबीआयने वर्षभरात ULI या पायलट प्रोजेक्ट दरम्यान किसान क्रेडीट कार्ड (KCC) लोन, डेअरी लोन, एमएसएमई लोन, पर्सनल लोन आणि होम लोन देण्यावर अधिक फोकस केले आहे.

कसा होणार फायदा

सध्या त्वरीत कर्ज देणारे काही अ‍ॅप आहेत. परंतु त्यावर आरबीआयचे नियंत्रण नाही. त्यामुळे त्यावर अनेकवेळा नियम डावलून काम होते. त्याचा फटका कर्ज घेणाऱ्यांना बसतो. परंतु युएलआय या अ‍ॅपवर थेट आरबीआयचे नियंत्रण असणार आहे. त्यामुळे त्यावर गोंधळ होण्याचा धोका नसणार आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना कुठे कमी व्याजदर आहे, ते सुद्धा कळणार आहे. ग्रामीण भागातील लोक आणि छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे. ULI अ‍ॅपमुळे कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभ होईल. कर्जाच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ आणि कागदी कामे कमी होतील.

फक्त पिन टाकून मिळणार कर्ज

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा आधार, ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी, पॅन प्रमाणीकरण आणि अकाउंट एग्रीगेटरसह विविध स्त्रोतांकडून ULI अ‍ॅप डेटा संकलित करेल. तसेच दुग्ध सहकारी संस्थांकडील दुधाचा डेटा यासारख्या सेवांशी देखील जोडले जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही फक्त तुमचा पिन टाकून UPI ​​मध्ये पेमेंट करता, त्याच प्रकारे तुम्ही पात्र असल्यास, तुमचा पिन टाकून तुम्ही कर्ज घेऊ शकता.

UPI अ‍ॅप एप्रिल 2016 मध्ये लाँच करण्यात आला. 8 वर्षांच्या प्रवासात UPI ने डिजिटल पेमेंटचे जग बदलून टाकले आहे. पानाच्या दुकानांपासून ते भाजीच्या स्टॉलपर्यंत, तुम्हाला QR कोड स्कॅनर बसवलेले दिसतील. भारताबाहेरसुद्धा देशांनीही UPI मॉडेल स्वीकारले आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.