
RBI Two Factor Authentication : ऑनलाईन व्यवहार करताना नेहमी काळजी घ्यावी, असे सांगितले जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनही याबाबतचे महत्त्वाचे निर्देश वेळोवेळी दिले जातात. असे असले तरी आज देशात रोजच अनेकांसोबत सायबर फ्रॉड होतो. काही लोकांची ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपयांची फसवणूक होते. हीच फसवणूक टाळण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करताना स्कॅम तसेच लुटमार होणार नाही. आरबीआयच्या या निर्णयाचे आता स्वागत केले जात आहे.
आरबीआयने सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड थांबवण्यासाठी फक्त ओटीपी व्हेरिफिकेशन प्रक्रियेवरच अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरबीआयने टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रत्यक्ष लागू होण्यासाठी अद्याप वेळ लागणार आहे. मात्र आरबीआयच्या या निर्णयाचे सगळीकडे स्वागत केले जात आहे. या निर्णयाअंतर्गत आता एसएमएस बेस्ड ओटीपीच्या पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाअंतर्गत आता ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना एका पासवर्डचीही गरज भासणार आहे. हा निर्णय येत्या 1 एप्रिल 2026 रोजीपासून लागू होईल.
येत्या 1 एप्रिल 2026 रोजी हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयानंतर तुम्हाला डिजिटल आर्थिक व्यवहार करायचे असतील तर अगोदर तुम्हाला एक ओटीपी येईल. त्यानंतर तुम्हाला सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे लागेल. यालाच टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हटले जात आहे. टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशनअंतर्गत व्यवहार करणारे तुम्हीच आहात ना? याची खातरजमा केली जाईल. कोड मॅच झाला तरच संबधित आर्थिक व्यवहार पूर्णत्त्वास जाईल. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करताना तुम्हाला फोनचा पासवर्ड किंवा बायोमॅट्रिक्सअंतर्गत तुम्हाला तुमची ओळख पटवावी लागेल. ही सुविधा एक अॅप बेस्ड असणार आहे.
दरम्यान, सध्याजरी आरबीआयचा हा निर्णय लागू होण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागणार असली तरी भविष्यात मात्र हा निर्णय लागू झाल्यानंतर ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणांत घट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.