AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Changes Cheque Clearance Rule : आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्वाचा नियम बदलला, ग्राहकांचा होणार थेट फायदा, आता फटाफट होणार हे काम

RBI Changes Cheque Clearance Rule : बँकिंग सिस्टिममध्ये आज म्हणजे 4 ऑक्टोंबर 2025 पासून मोठा बदल होणार आहे. यामध्ये ग्राहकांचा फायदा आहे. नव्या बदलामुळे व्यवसायात कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने मॅनेज होईल. बँकिंग प्रणालीत कार्यकुशलता आणि विश्वसनीयता वाढेल.

RBI Changes Cheque Clearance Rule : आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्वाचा नियम बदलला, ग्राहकांचा होणार थेट फायदा, आता फटाफट होणार हे काम
Banking
| Updated on: Oct 04, 2025 | 9:06 AM
Share

बँकिंग सिस्टिममध्ये (Banking System) आज म्हणजे 4 ऑक्टोंबर 2025 पासून मोठा बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 ऑक्टोंबरपासून फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम  (Fast Cheque Clearance System) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार, चेक जमा केल्यानंतर पैसे त्याचदिवशी खात्यात येतील. त्यासाठी पूर्वीप्रमाणे 2 ते 3 दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही.

आतापर्यंत चेक क्लियरेंससाठी काही दिवसांचा वेळ लागायचा. पण आता RBI ने नव्या व्यवस्थेतंर्गत Continuous Cheque Clearing मोड सिस्टिम सुरु केली आहे. या अंतर्गत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जितके चेक येतील, त्यांची इमेज आणि डेटा तात्काळ स्कॅन करुन क्लियरिंग हाउसला पाठवला जाईल. त्या अंतर्गत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चेत कन्फर्म करावा लागेल. बँकेने वेळेत उत्तर दिलं नाही, तर चेक ऑटोमॅटिक क्लियर मानला जाईल.

नवीन नियम 2 टप्प्यात होणार लागू

टप्पा 1 : 4 ऑक्टोंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत बँकांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चेकची पुष्टि करण्याचा वेळ असेल.

टप्पा 2 : 3 जानेवारी 2026 पासून बँकांना चेक कन्फर्म करण्यासाठी केवळ 3 तासांचा वेळ मिळेल. सकाळी 10 वाजता चेक जमा केला तर दुपारी 2 वाजेपर्यंत तो चेक क्लियर करावा लागेल. त्यामुळे चेक क्लियरेंस अजून वेगवान होईल.

सुरुवातीला कुठल्या शहरात लागू होणार नियम?

ही नवीन व्यवस्था सुरुवातीला दिल्ली, मुंबई, चेन्नई या मोठ्या शहरात क्लियरिंग ग्रिडवर लागू होईल. नंतर देशभरात हा नियम लागू केला जाईल. यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. चेक वठण्याचा अनुभव अजून चांगला होईल.

ग्राहकांना काय अपील केलय?

RBI ने मोठ्या अमाउंटच्या चेकसाठी Positive Pay System अनिवार्य केली आहे. यात ग्राहक बँकांना चेकच महत्वपूर्ण विवरण आधीच सांगून ठेवतात. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. चुकीचे चेक ऑटोमॅटिकली क्लियर होणार नाहीत.

या परिवर्तनाचा ग्राहक आणि व्यवसाय दोघांना फायदा होईल. ग्राहकांना वेगात पैसे मिळतील. देण्या-घेण्याच्या व्यवहारातील अनिश्चितता कमी होईल. व्यवसायात कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने मॅनेज होईल. बँकिंग प्रणालीत कार्यकुशलता आणि विश्वसनीयता वाढेल.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.