AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI Repo Rate : EMI चा बोजा कायम, रेपो रेटमध्ये नाही झाला कोणताच बदल, आरबीआयने पुन्हा ग्राहकांना रडवले

Loan EMI : तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे.

RBI Repo Rate : EMI चा बोजा कायम, रेपो रेटमध्ये नाही झाला कोणताच बदल, आरबीआयने पुन्हा ग्राहकांना रडवले
आरबीआयचा ग्राहकांना मोठा झटका
| Updated on: Aug 08, 2024 | 10:53 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा ग्राहकांच्या पदरात निराशा टाकली. गेल्या काही वर्षांपासून कर्जाचा हप्ता कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांना केंद्रीय बँकेने धक्का दिला. पतधोरण समितीची बैठक झाली. त्यात रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो दर जैसे थे असतील, परिणामी कर्जावरील EMI कमी होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. रेपो दर हा पूर्वीसारखाच 6.5 टक्के इतका असेल.

फेब्रुवारी 2023 पासून नाही झाला बदल

देशात महागाईचा कहर आहे. सर्वसामान्यांची महागाईपासून सूटका झालेला नाही. रेपो दर कमी झाला तर निदान कर्जाचा हप्ता तरी कमी होईल, अशी ग्राहकांची अपेक्षा होती, ती फोल ठरली. 9 व्यांदा आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कोणताच बदल केला नाही. फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेटमध्ये कोणताच बदल झालेला नाही. गेल्या 25 वर्षांत असे दुसऱ्यांदा घडले, ज्यावेळी आरबीआयने दीर्घकाळांपर्यंत रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

या आठवड्यात झाली बैठक

पतधोरण समितीची 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान बैठक झाली. अखेरच्या दिवशी आज, 6 सदस्यीय समितीने 4-2 अशा बहुमताने रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्रीय बँकेने पतधोरण समितीला रेपो दराबाबत नरमाईचे धोरण ठेवण्यास सांगितले आहे. तर बँकांसाठी स्टँडर्ड डिपॉझिट फॅसिलिटी रेट (SDF) 6.25%, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर 6.75 टक्के ठेवण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.

महागाईने फेरले पाणी

महागाईने पुन्हा पाणी फेरले. त्यामुळे सर्वसामान्यांना कर्जाचा हप्ता स्वस्त होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात महागाई दर उसळला नाही. पण जून महिन्यात महागाई वाढली. तिसऱ्या तिमाहीत महागाईत कमी येण्याची शक्यता आहे. भूराजकीय संकट, नवीन युद्ध, शेजारील देशातील उलथापालथ आणि सरकारवरील वाढत्या कर्जामुळे नवीन आव्हानं अर्थव्यवस्थेसमोर आहेत.

असा वधारला रेपो दर

दोन वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर रेपो दरात वाढ झालेली नाही. हा दर कायम आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.