AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा कपात

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशने गुरुवारी एलपीजी सिलेंडरच्या नव्या सुधारित दरांची घोषणा केली. यानुसार, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. या अंतर्गत अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 1 रुपये 46 पैसे तर विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 1 […]

गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा कपात
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल वितरण कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशने गुरुवारी एलपीजी सिलेंडरच्या नव्या सुधारित दरांची घोषणा केली. यानुसार, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. या अंतर्गत अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 1 रुपये 46 पैसे तर विना अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू होणार असल्याची माहिती आयओसीएलने दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एलपीजीच्या किंमतीत घट झाली आहे, तसेच रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्याने एलपीजीच्या किंमती कमी झाल्याचंही कंपनीने सांगितलं. या निर्णयानंतर मुंबईमध्ये विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत (14.2 कि. ग्रॅ.) 630 रुपयांवर येईल, जी आधी 660 रुपये इतकी होती. तर अनुदानित सिलेंडरची किंमत (14.2 कि. ग्रॅ.) 491.20 रुपये इतकी असेल, जी आधी 492.66 रुपये इतकी होती.

मागील तीन महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात होत आहे. याआधी 1 डिसेंबरला अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 5 रुपये 91 पैसे तर विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 120 रुपये 50 पैशांची कपात करण्यात आली होती. यानंतर अनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 492.66 रुपये झाली, जी आधी 498.57 रुपये इतकी होती. तर, विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 660 रुपयांवर आली होती, जी आधी 780.50 रुपये इतकी होती.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...