Stock : रेखा झुनझुनवाला यांचा हा स्टॉक करणार मालामाल, लवकरच 1500 रुपयांचा स्तर गाठणार, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा शेअर..

Stock : हा स्टॉक तुम्हाला मालामाल करु शकतो..

Stock : रेखा झुनझुनवाला यांचा हा स्टॉक करणार मालामाल, लवकरच 1500 रुपयांचा स्तर गाठणार, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हा शेअर..
हा स्टॉक करेल मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 10:29 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदार (Investors) नेहमी योग्य कंपनीचा तपास करतो. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने (ICICI Securities) अशाच एका शेअरचा खुलासा केला आहे. हा शेअर येत्या काळात गुंतवणूकदारांना मालामाल करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या स्टॉकमध्ये रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwla) यांनीही गुंतवणूक केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या शेअरमधून चांगली कमाईची संधी मिळेल, असा दावा करण्यात येत आहे. अर्थात हा अंदाज आहे, गुंतवणुकीचा सल्ला तर अजिबात नाही. तुमच्या वित्तीय सल्लागाराची मदत आणि तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही गुंतवणूक करु शकता.

तर ही कंपनी आहे टाटा समूहाची. टाटा कम्युनिकेशन लिमिटेड (Tata Communications Ltd) या कंपनीचे मार्केट कॅप 37,085.63 कोटी रुपये आहे. येत्या काही दिवसात शेअर बाजारात ही कंपनी भरारी घेईल. त्यामुळे या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने टाटा समूहाचा हा शेअर 1310-1332 रुपयादरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार हा शेअर 1535 रुपयांवर पोहचेल. तर स्टॉप लॉस 1212 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या दोन आठवड्यापासून या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. बाजाराची दशा आणि दिशा काहीही असली तरी हा शेअर रॉकेटसिंग ठरणार असल्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसात या शेअरमधील तेजी कायम राहण्याचा अंदाज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने वर्तविला आहे. अंदाजानुसार हा शेअर 1535 रुपयांवर पोहचेल.

टाटा कम्युनिकेशन्समध्ये रेखा झुनझुनवाला यांचा मोठा हिस्सा आहे. त्यांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. दुसऱ्या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांनी या कंपनीचे 45,75,687 शेअर खरेदी केले आहेत. या कंपनीत त्यांचा एकूण हिस्सा 1.61 टक्के आहे.

शुक्रवारी टाटा कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये 1.14 टक्क्यांची घसरण झाली. हा शेअर 1297.80 रुपयांवर घसरला. या वर्षात या स्टॉकमध्ये मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. या स्टॉकमध्ये वर्षभरात 10.21 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही तज्ज्ञांच्या मते, हा शेअर येत्या काही दिवसात कमाल दाखविल्याशिवाय राहणार नाही.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.