पगारकपातीचा निर्णय मागे, बोनसही देणार, रिलायन्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

रिलायन्स इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी कंपनीकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे (Reliance industries will give gift to employee).

पगारकपातीचा निर्णय मागे, बोनसही देणार, रिलायन्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी कंपनीकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांची पगारकपात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला जाणार आहे (Reliance industries will give gift to employee).

लॉकडाऊनदरम्यान अनेक कंपन्यांवर आर्थिक संकट ओढवलं होतं. त्यामुळे अनेकांच्या नौकऱ्यादेखील गेल्या. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 ते 50 टक्के पगारकपात केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीनेदेखील 15 लाखापेक्षा जास्त वार्षिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 ते 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कंपनीने तो निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे रिलायन्स कंपनीने कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स बोनसदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कंपनी जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांना पुढच्या वर्षाच्या ‘व्हॅरिएबल पे’चे 30 टक्के पैसे अ‍ॅडव्हान्समध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘पीटीआय’ने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे (Reliance industries will give gift to employee).

कोरोना संकट काळात रिलायन्स कंपनीच्या हायड्रोकार्बन म्हणजेच रिफायनरी आणि पेट्रोलियम व्यवसायाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे कंपनीने हायड्रोकार्बन डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 ते 50 टक्के कपात केली होते. त्याचबरोबर परफॉर्मन्स बोनस आणि इतर इनसेंटिव्ह देखील दिला नव्हता. आता कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळणार आहे.

हेही वाचा : 50 लाख ते 200 अब्ज डॉलरपर्यंतचा प्रवास, मुकेश अंबानींच्या यशाचं रहस्य उघड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *