AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसा ठेवा तयार, लवकरच व्हाल मालामाल, मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचा आयपीओ येणार

Mukesh Ambani IPO : रिलायन्स हा देशातील मोठा उद्योग समूह आहे. रिलायन्सच्या काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता रिलायन्स समूहातील ही कंपनी लवकरच शेअर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पैसा ठेवा तयार, लवकरच व्हाल मालामाल, मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचा आयपीओ येणार
रिलायन्स समूह करणार मालामाल
| Updated on: May 28, 2024 | 11:39 AM
Share

रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या या कंपनीने 2016 मध्ये दूरसंचार क्षेत्रात मोठा भूकंप घडवला होता. लवकरच ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. या कंपनीत 13 परदेशी कंपन्यांची हिस्सेदारी आहे. 2020 मध्ये अंबानी यांनी हा वाटा दिला होता. 57 ते 64 अब्ज डॉलरमध्ये ही विक्री झाली होती. या कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

संचालक मंडळाचा हिरवा कंदिल

हिंदू बिझनेसलाईनने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, रिलायन्स समूहातील संचालक मंडळ रिलायन्स जिओचा आयपीओ आणण्यासंदर्भात अनुकूल आहे. टेलिकॉम क्षेत्रात या कंपनीने धाक जमावला आहे. कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग आहे. त्यामुळे आता बाजारात उतरण्यास हरकत नसल्याने संचालक मंडळाने या प्रक्रियेला हिरवा कंदिल दाखविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अर्थात ही प्राथमिक चर्चा आहे. बाजारातील तज्ज्ञांनुसार, रिलायन्स जिओचा आयपीओची किंमत 1200 रुपये असू शकते. विश्लेषकांच्या मते, रिलायन्स जिओचे मूल्यांकन 82 ते 94 अब्ज डॉलर इतके आहे. मोबाईल टेरिफमध्ये वाढ झाल्याने हा आकडा वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. देशात मोबाईल टेरिफमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कोणाचा किती वाटा?

  1. Reliance Jio च्या आयपीओमध्ये खासगी इक्विटी फर्म आणि इतर गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. वर्ष 2020 मध्ये या कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी रिलायन्स जिओमध्ये 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. आयपीओच्या ऑफर फॉर सेलच्या (OFS) माध्यमातून एक मोठा हिस्सा विक्री होऊ शकतो.
  2. 2024 मधील आर्थिक वर्षात रिलायन्स जिओचा महसूल एक लाख कोटींच्या घरात पोहचला. तर निव्वळ नफ्याचे गणित 20,607 कोटींच्या घरात गेले. रिलायन्स समूहातील एकूण महसूलात कंपनीचा वाटा 10 टक्के तर नफ्याचे योगदान 29 टक्के होते. 2020 मध्ये अंबानी यांनी परदेशी पाहुण्यांना या कंपनीत वाटा दिला होता. या कंपनीत 13 परदेशी कंपन्यांची हिस्सेदारी आहे. 57 ते 64 अब्ज डॉलरमध्ये हा व्यवहार झाला होता.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.