यंदाच्या आर्थिक वर्षातील RBI चा अहवाल जारी, 5,45,00,080 बनावट नोटा जप्त, कोणत्या चलनाच्या किती बनावट नोटा?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी यंदाच्या वर्षातील आर्थिक अहवाल जारी केला आहे. (Reserve Bank Of India Annual Report 2021)

यंदाच्या आर्थिक वर्षातील RBI चा अहवाल जारी, 5,45,00,080 बनावट नोटा जप्त, कोणत्या चलनाच्या किती बनावट नोटा?
RBI-Currency
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 8:27 AM

Reserve Bank Of India Annual Report 2021 मुंबई : देशात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. दरवर्षी देशात कोट्यावधी रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गुरुवारी यंदाच्या वर्षातील आर्थिक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 5.45 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. (Reserve Bank Of India Annual Report 2021 Fake Currency Notes)

आरबीआयच्या अहवालात नेमकं काय?

आरबीआयच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जवळपास 2,08,625 बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. त्यापैकी 8107 म्हणजेच जवळपास 4 टक्के बनावट नोटा या आरबीआयने पकडल्या आहेत. तर अन्य बँकांनी 2,00,518 म्हणजेच 96 टक्के बनावट नोटा पकडल्या आहेत. या बनावट नोटांपैकी सर्वाधिक बनावट नोटा या 100 रुपयांच्या आहेत.

तर दुसरीकडे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नवीन 500 रुपये बनावट नोटांमध्ये 31.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 30,054 बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत यंदा 2020-21 मध्ये 39,453 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र इतर बनावट चलनाच्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणत्या आणि किती बनावट नोटा जप्त?

चलन  नोटांची एकूण संख्या  एकूण किंमत
10 रुपयाची नोट 304 3,040 रुपये
20 रुपयाची नोट 267 5,340 रुपये
50 रुपयाची नोट 24,802 12,40,100 रुपये
100 रुपयाची नोट 1,10,736 1,10,73,600 रुपये
200 रुपयाची नोट  24,245 48,49,000 रुपये
500 रुपयाची नोट 39,462 1,97,31,000 रुपये
1000 रुपयाची नोट 2 2,000 रुपये
2000 रुपयाची नोट 8,798 1,75,96,000 रुपये
(2 आणि 5 रुपयाच्या

एकूण  9 नोट Extra)

एकूण रक्कम  – 5,45,00,080  रुपये 

सर्वाधिक 100 रुपयांच्या बनावट नोटा जप्त

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सर्वाधिक 100 रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. यात आरबीआय आणि अन्य बँकांनी 100 रुपयांच्या 1,10,736 नोटा पकडल्या आहेत. त्याची एकूण रक्कम 1,10,73,600 इतकी आहे. पण गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. गेल्यावर्षी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 100 रुपयांच्या 1,68,739 नोटा पकडण्यात आल्या होत्या. याची एकूण रक्कम 1,68,73,900 रुपये इतकी होती.

इतर किती नोटा जप्त

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2 आणि 5 रुपयांच्या 9 बनावट नोटा पकडण्यात आल्या आहे. गेल्या आर्थिक वर्षात अशा 22 नोटा पकडण्यात आल्या होत्या. 2020-21 मध्ये 10 रुपयांच्या 304 नोटा, 20 रुपयांच्या 267 नोटा, 50 रुपयांच्या 24,802 नोटा, 100 रुपयांच्या 1,10,736 नोटा आणि 200 रुपयांच्या 24,245 बनावट नोटा पकडल्या आहेत.

तर 500 रुपयांच्या महात्मा गांधींच्या जुन्या मालिकेच्या बनावट 9 नोटा पकडण्यात आल्या आहेत. या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या आहेत. तर नवीन 500 च्या 39,453 नोटा पकडल्या गेल्या आहेत. यात 1000 रुपयांच्या दोन जुन्या नोटांचा समावेश आहे. त्यासोबतच 2000 रुपयांच्या 8,798 बनावट नोटा बँकेने पकडल्या आहेत.

RBI-Annual-Report-Currency

RBI-Annual-Report-Currency

बनावट चलन ओळखण्यासाठी आरबीआयच्या सूचना 

दरम्यान देशभरात बनावट चलनाचा काळाबाजाराबाबत पोलीस आणि अनेक राज्यांतील केंद्रीय संस्था सतर्क करत असते. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये आरोपींना बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने खरं आणि बनावट चलन ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यानुसार बनावट नोटा ओळखा असा सल्ला आरबीआयने दिला आहे.  (Reserve Bank Of India Annual Report 2021 Fake Currency Notes)

संबंधित बातम्या : 

निवृत्तीआधी ‘या’ 5 गोष्टींची काळजी घेतली तर कधीच पैशांची अडचण येणार नाही

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करुन मालामाल होण्याची संधी, पण गुंतवणुकीपूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.