‘लॉकडाऊन’ परततोय? तिसऱ्या लाटेची भीती? सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय शेड्युल फ्लाईटस 30 सप्टेबरपर्यंत सस्पेंड

सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवण्याची घोषणा केलीय. व्यावसायिक उड्डाणांवर ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची ही माहिती डीजीसीएने शेअर केलीय.

'लॉकडाऊन' परततोय? तिसऱ्या लाटेची भीती? सरकारचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय शेड्युल फ्लाईटस 30 सप्टेबरपर्यंत सस्पेंड
Indigo Airlines

नवी दिल्लीः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दिवसागणिक वाढत आहे. तसेच कोरोनाचे नवे रुग्ण खूप वेगाने वाढू लागलेत आणि दररोज 45 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकारने नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी वाढवण्याची घोषणा केलीय. व्यावसायिक उड्डाणांवर ही बंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची ही माहिती डीजीसीएने शेअर केलीय.

हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होणार नाही

याआधी डीजीसीएने 31 ऑगस्टपर्यंत भारतात येण्यासाठी नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सेवा निलंबित केली होती. आता ती एक महिन्याने वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली. हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांना लागू होणार नाही. या व्यतिरिक्त जर एखाद्या फ्लाईटला डीजीसीएकडून विशेष मान्यता मिळाली असेल, तर हा नियम तेथेही लागू होणार नाही.

देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन लादले

मार्च 2020 मध्ये सरकारने प्रथमच देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन लादले. त्या काळात गाड्या, विमानांसह सर्व सेवा सुमारे दोन महिने बंद राहिली. मे महिन्यापासून विमानसेवा पूर्ववत झाली. यामध्ये केवळ देशांतर्गत हवाई सेवेला मंजुरी देण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणावर अजूनही बंदी आहे. या दरम्यान दोन्ही देशांमधील हवाई बबलसह हवाई संपर्क चालू आहे.

देशांतर्गत उड्डाण सात वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले

विमान प्रवास विभागाने प्रवासात घेतलेल्या वेळेच्या आधारावर देशांतर्गत उड्डाण सेवेचे सात वेगवेगळ्या बँडमध्ये विभाजन केले. प्रत्येक बँडसाठी किंमत मर्यादा (किमान आणि कमाल भाडे) निश्चित करण्यात आले. त्याच महिन्यात सरकारने प्रत्येक बँडसाठी किमान आणि कमाल भाडे वाढवण्याची घोषणा केली होती.

40 मिनिटांपेक्षा कमी मार्गांसाठी हवाई भाडे 2900 रुपये

40 मिनिटांपेक्षा कमी मार्गांसाठी कमी हवाई भाडे 2600 वरून 2900 केले. जास्त हवाई भाडे 12.82 टक्क्यांनी वाढवून 8800 केले. 40-60 मिनिटांच्या हवाई मार्गांसाठी कमी हवाई भाडे 3300 वरून 3700 आणि जास्त हवाई भाडे 12.24 टक्क्यांनी वाढवून 11,000 रुपये करण्यात आले. 60-90 मिनिटांच्या फ्लाईटसाठी किमान तिकीट 4500 रुपये आणि कमाल तिकीट 13200 रुपये करण्यात आलीय.

नवीन कमी भाडे काय आहे ते जाणून घ्या

90-120, 120-150, 150-180 आणि 180-210 मिनिटांच्या उड्डाणांसाठी नवीन लोअर कॅप 5300, 6700, 8300 आणि 9800 रुपये करण्यात आलेय. सध्या या कॅपची किंमत 4700, 6100, 7400 आणि 8700 रुपये होती. 90-120, 120-150, 150-180 आणि 180-210 मिनिटांच्या उड्डाणांसाठी अप्पर कॅपमध्ये 12.3 टक्के, 12.42 टक्के, 12.74 टक्के आणि 12.39 टक्के वाढ करण्यात आली. यात प्रवासी सुरक्षा शुल्क आणि वापरकर्ता विकास शुल्क समाविष्ट नाही.

संबंधित बातम्या

BPCL नंतर आता मोदी सरकार ‘या’ दोन सरकारी खत कंपन्या विकणार; 1,200 कोटी कमावणार

सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देणार, फक्त एवढे छोटे काम करा

Returning to ‘Lockdown’? Fear of the third wave? Government’s major decision, international scheduled flights suspended until September 30

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI