AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटनंतर या क्षेत्रातही सचिन तेंडुलकरची तूफान फटेकबाजी, कुठे केली कोट्यवधींची गुंतवणूक ?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा केवळ क्रिकेटच्या जगातच नाही तर स्टार्टअप्सच्या जगातही तूफान फटकेबाजी करतोय. सचिन तेंडुलकरने अशा अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवले आहेत, ज्यातून तो दरवर्षी कोट्यवधी रुपये नफा कमावतो. ते स्टार्टअप्स कोणते, ते जाणून घेऊया.

क्रिकेटनंतर या क्षेत्रातही सचिन तेंडुलकरची तूफान फटेकबाजी, कुठे केली कोट्यवधींची गुंतवणूक ?
सचिन तेंडुलकरImage Credit source: social media
| Updated on: Jul 24, 2025 | 11:59 AM
Share

Sachin Tendulkar’s Startup : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आता व्यवसायाच्या क्षेत्रातही खूप धावा फटकावतोय. त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सचिनने जो विश्वास कमावला होता, त्या विश्वासाच्या आधारे तो आता स्टार्टअप्समध्ये देखील गुंतवणूक करत आहे. विशेष म्हणजे सचिन फक्त पैसे गुंतवत नाही तर त्याचे नाव आणि अनुभव वापरून ब्रँडची जाहिरातही करत आहे. चला जाणून घेऊया अशा 5 भारतीय स्टार्टअप्सबद्दल ज्यामध्ये तेंडुलकरने गुंतवणूक केली आहे.

जेटसिंथेसिस (JetSynthesys)

2021 साली सचिनने JetSynthesys मध्ये गुंतवणूक केली होती. मोबाईल गेमिंग आणि चाहत्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्मच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सचिन तेंडुलकरने जेटसिंथेसिसमध्ये 20 लाख डॉलर्स (म्हणजे सुमारे 16.3कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. यासह, सचिन तेंडुलकर या कंपनीच्या भागधारकांपैकी एक झाला आहे. या कंपनीने ‘Sachin Saga Cricket Champions’ नावाचा एक लोकप्रिय मोबाईल गेम तयार केला आहे. तसेच, तेंडुलकरचे अधिकृत ॲप 100MB देखील याच कंपनीचे आहे. याचा अर्थ असा की सचिन आता गेमिंग जगातही हिट आहे.

Spinny

2021 मध्ये सचिनने Spinnyमदध्ये गुंतवणूक केली आणि त्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही बनला. ही कंपनी सेकंड-हँड कार खरेदी आणि विक्रीसाठी एक व्यासपीठ आहे. सचिनच्या पाठिंब्याने हा ब्रँड वेगाने वाढला. त्याने बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूसोबत एका जाहिरातीतही काम केले आहे.

Kissht

डिसेंबर 2024 मध्ये सचिनने फिनटेक स्टार्टअप Kisshtमध्ये गुंतवणूक केली आणि त्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला. हे स्टार्टअप कोणत्याही कागदपत्रांशिवाय लोकांना डिजिटल कर्ज देते. तो वित्त आणि तंत्रज्ञानाबाबतही गंभीर आहे हे सचिनेन या माध्यमातून दाखवून दिलं.

Smartron

2016 साली जेव्हा भारतात स्मार्ट डिव्हाइस उद्योग नवीन होता, तेव्हाच सचिनने Smartron नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी स्मार्ट होम आणि वेअरेबल डिव्हाइस बनवते. सचिन हा त्याचा सुरुवातीचा गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता.

स्मॅश एंटरटेनमेंट (Smaaash Entertainment)

Smaaash ही एक कंपनी आहे जी प्रेक्षकांना वास्तवातून व्हर्च्युअल खेळ दाखवते, म्हणजेच, तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात मैदानावर खेळत असल्यासारखे वाटेल. सचिन तेंडुलकरने 2013 सालीच या कंपनीत गुंतवणूक केली होती. कोविडनंतर, जेव्हा रायपूर आणि विजयवाडा सारख्या शहरांमध्ये त्यांची एंटरटेनमेंट सेंटर्स पुन्हा सुरू झाली, तेव्हा या ब्रँडच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली. म्हणजेच, सचिनची ही सुरुवातीची गुंतवणूक आता त्याला चांगले परिणाम देत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.