एसबीआयने या लोकांना केले मालामाल, केवळ 1 वर्षात पैसे झाले दुप्पट

एसबीआयच्या शेअर्सने अवघ्या एका वर्षात दुप्पट परतावा दिला आहे. (SBI made these people rich, doubled the money in just 1 year)

एसबीआयने या लोकांना केले मालामाल, केवळ 1 वर्षात पैसे झाले दुप्पट
एसबीआयने या लोकांना केले मालामाल

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) वेळोवेळी आपल्या ग्राहकांना प्रत्येक माहिती प्रदान करते. ट्वीटद्वारे किंवा मॅसेजद्वारे प्रत्येक माहिती आपल्या ग्राहकांशी शेअर करते. ही बँक आपल्या ग्राहकांच्या उत्पन्नाच्या बाबतीत इतर अनेक बँकांपेक्षा खूप पुढे आहे. या बँकेच्या शेअर्सने ग्राहकांना मालामाल केले आहे. एसबीआयच्या शेअर्सने अवघ्या एका वर्षात दुप्पट परतावा दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी एसबीआयच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांचे पैसे आता 1 लाखांचे 2 लाख झाले आहेत. (SBI made these people rich, doubled the money in just 1 year)

5 मे 2020 ते 5 मे 2021 पर्यंतचा प्रवास

5 मे 2020 रोजी एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये एसबीआयचा शेअर जवळपास 171 रुपये होता, जो 5 मे 2021 रोजी ते 356 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच या एक वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने दुप्पटीपेक्षा जास्त उत्पन्न दिले आहे. या काळात ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षासाठी शेअर्समध्ये पैसै गुंतवून ठेवले त्यांचे पैसे दुप्पट वाढले आहेत. 5 मे 2020 रोजी एखाद्याने कंपनीचे 100 शेअर्स खरेदी केले असतील, तर त्यावेळी किंमत 17,100 रुपयांच्या जवळ होती. ती आता 35,600 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. म्हणजेच दुप्पट परतावा. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्यांचे पैसे आता 2 लाख रुपयांहून अधिक झाले आहेत.

एफडीमध्ये किती परतावा

एसबीआयच्या मुदत ठेवींमधील परतावा 4.90 टक्के ते 5.80 टक्क्यांपर्यंत मिळते. तथापि, मुदत ठेवींमध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. पण हिंमत करुन आणि प्लानिंग करुन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दीर्घ मुदतीत चांगला नफा मिळू शकेल. तथापि, स्टॉक मार्केटमधून पैसे कमविण्यासाठी दीर्घकालीन विचारसरणी, आपल्या ब्रोकरचा किंवा मार्केट तज्ज्ञाचा सल्ला आणि चांगल्या प्लानिंगची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. (SBI made these people rich, doubled the money in just 1 year)

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Corona Virus | कोरोना काळात ‘जॉगिंग’साठी बाहेर जाणे सुरक्षित ठरेल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला