AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लय भारी! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना

विशेष म्हणजे वर्ध्यातील या कंपनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवाना मिळवून दिला आहे. (Nitin Gadkari gave license For remedivir production at wardha)

लय भारी! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना
Nitin Gadkari
| Edited By: | Updated on: May 06, 2021 | 4:28 PM
Share

वर्धा : राज्यात एकीकडे कोरोनावर प्रभावी पडणाऱ्या रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दरदिवशी 30 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे वर्ध्यातील या कंपनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवाना मिळवून दिला आहे. (Union Minister Nitin Gadkari gave license for the production of remedivir at Wardha based company)

आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती

वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. नुकतंच नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस उपस्थितीत होते.

नितीन गडकरी यांनी रेमडेसिव्हीर उत्पादन करणाऱ्या जेनेटिक सायन्स कंपनीचा आढावा घेतला. तसेच याचे उद्धाटन नितीन गडकरींचे हस्ते करण्यात आले आहे. त्यासोबतच जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचे संचालक डॉ.महेंद्र क्षीरसागर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने रेमडेसिव्हीरचे उत्पादन

दरम्यान काही दिवसापूर्वी राज्यातील रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी जेनेटिक सायन्स लॅबला रेमडेसिव्हीर उत्पादन करण्याची परवानगी मिळवून दिली. नितीन गडकरींच्या पाठपुराव्याने या ठिकाणी रेमडेसिव्हीरचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये 30 हजार बनवण्याचा लक्ष्य आहे. हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

नितीन गडकरी यांचे रेमडेसिव्हीरसाठी प्रयत्न

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती. (Union Minister Nitin Gadkari gave license for the production of remedivir at Wardha based company)

संबंधित बातम्या : 

कोरोनाविरुद्धच्या लढाईची जबाबदारी गडकरींकडे देण्याची पुन्हा पुन्हा मागणी का? वाचा सविस्तर

Corona Virus Fact Check | प्राण्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो ?, केंद्र सरकारच्या ‘या’ माहितीनंतर सत्य आलं समोर, वाचा सविस्तर

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.