Corona Virus Fact Check | प्राण्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो ?, केंद्र सरकारच्या ‘या’ माहितीनंतर सत्य आलं समोर, वाचा सविस्तर

Corona Virus Fact Check | प्राण्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो ?, केंद्र सरकारच्या 'या' माहितीनंतर सत्य आलं समोर, वाचा सविस्तर
CORONA FACT CHECK

कोरोना विषाणूचा संसर्ग प्राण्यामार्फत होतो अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर आता पडदा पडला आहे. (corona virus spread fact check)

prajwal dhage

|

May 05, 2021 | 6:56 PM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. देशात रोज लाखो नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाने आपले रुप बदलल्यामुळे देशात मृतांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग ( Corona virus) प्राण्यामार्फत होतो अशी चर्चा सुरु झाली होती. प्राण्यांमार्फत कोरोनाचा प्रसार होत असल्याच्या चर्चेमुळे हा विषाणू आणखी विध्वंसक ठकरणार असे भाकीत केले जात होते. या पार्श्वभूमीवर कोरोना खरंच प्राण्यांमार्फत पसरतो का यावर केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिली आहे. सरकारने दिलेल्या या महितीनंतर आता या चर्चेवर एका प्रकारे पडदा पडला आहे. (fact check Corona virus do not spread through animals it only spread through animal to animal said NITI aayog)

हैदराबादमध्ये 8 सिंहांना लागण झाल्यामुळे खळबळ

देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आधीच सगळं काही विस्कळीत झालेलं आहे. त्यानंतर 4 मे रोजी एक वेगळेच वृत्त आले होते. यामध्ये हैदराबाद येथील नेहरु प्राणीसंग्रहालयातील तब्बल 8 सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत ‘द हिंदू’ या ईंग्रजी वृत्तपत्राने सविस्तर बातमी दिली होती. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत होते. यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर भारतात पहिल्यांदाच प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती.

प्राण्यांमार्फत कोरोनाचा प्रसार होत नाही

कोरोनाचा प्रसार हा प्राण्यांमार्फतसुद्धा होऊ शकतो अशी चर्चा सध्या समाजमाध्यमांवर होत आहे. मात्र, ही चर्चा सुरु असतानाच नीती आयोगाच्या ( NITI aayog) आरोग्य विभागाने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी कोरोनाचा विषाणूचा प्रसार हा प्राण्यांच्या मार्फत होत नाही, असे सांगितले आहे. त्यांनी कोरोना विषाणू हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो. एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होते. प्राण्यांकडून माणसांना कोरोनाची लागण होत नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

दरम्यान, नीती आयोगाने कोरोना संसर्गाबाबत स्पष्टपणे सांगितल्यावर अनेक गोष्टींवर पडदा पडला आहे. कोरोनाची लागण ही प्राण्यांकडून होत नसून देशामध्ये कोरोनाचा प्रसार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेला बळी न पडता, कोरोनाविषयक नियम पाळावेत आणि स्व:तची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Maratha Reservation Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार

कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना 15 दिवसांमध्ये पुन्हा लागण, Immunity Escape म्हणजे काय ?

भारतात थैमान घालणारा कोरोनाचा म्युटंट नेमका कसा दिसतो, वाचा सविस्तर माहिती

(fact check Corona virus do not spread through animals it only spread through animal to animal said NITI aayog)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें