AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी, बँकेच्या ‘या’ निर्णयामुळे कोट्यवधी लोकांना फटका बसणार

स्टेट बँक ऑफ इंडियात कोट्यवधी लोकांची खाती आहेत. या सर्व ग्राहकांना मोठा फटका बसला आहे.आगामी काळात ग्राहकांना कमी व्याज मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

SBI च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी, बँकेच्या 'या' निर्णयामुळे कोट्यवधी लोकांना फटका बसणार
SBI
| Updated on: Jun 16, 2025 | 3:08 PM
Share

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहे. या सर्व ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. स्टेट बँकेने त्यांच्या अल्प आणि दीर्घ अशा सर्व मुदतीच्या एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांना कमी व्याज मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्याजदरात कपात

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व एफडी योजनांवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने आणि बचत खात्यांवरील व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. यामुळे आता यापुढे ग्राहकांना कमी व्याजदर मिळणार आहे. हे नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत.

आरबीआयच्या निर्णयानंतर व्याजदरात कपात

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी त्यांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकांनी व्याजदर कमी केले होते. त्यांतर आता एसबीआयनेही व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआयचे एफडीवरील नवीन व्याजदर

एसबीआयने सर्व नियमित एफडी कालावधींवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने कमी केला आहे. या कपातीनंतर आता बँक सामान्य नागरिकांना एफडीवर कमीत कमी 3.05 % आणि जास्तीत जास्त 6.45% पर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक कमीत कमी 3.55 % आणि जास्तीत जास्त 7.05 % व्याज देत आहे. हे नवीन दर 15 जून 2025 पासून लागू झाले आहेत अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

बचत खात्यावरील नवीन व्याजदर

स्टेट बँकेने बचत खात्याचा व्याजदर वार्षिक 2.5 % केला आहे. हा नवीन दर 15 जून 2025 पासून लागू आहे. यापूर्वी बँक 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.7 % आणि 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 3% व्याज देत होती, मात्र आता त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.