घर, कार आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एसबीआयकडून खुशखबर

गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज परताव्यासाठी मुदतवाढ असे विविध निर्णय (SBI loan rates) बँकेने मंगळवारी जाहीर केले. यासोबतच ग्राहकांना स्वस्त कर्जासोबत प्रोसेसिंग फीमध्ये सूट, पूर्व मान्य डिजीटल कर्ज याचाही लाभ घेता येणार असल्याचं बँकेने सांगितलंय.

घर, कार आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एसबीआयकडून खुशखबर

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना खुशखबर दिली आहे. सणउत्सवांपूर्वी स्टेट बँकेने विविध कर्जाच्या दरांमध्ये कपात (SBI loan rates) केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज परताव्यासाठी मुदतवाढ असे विविध निर्णय (SBI loan rates) बँकेने मंगळवारी जाहीर केले. यासोबतच ग्राहकांना स्वस्त कर्जासोबत प्रोसेसिंग फीमध्ये सूट, पूर्व मान्य डिजीटल कर्ज याचाही लाभ घेता येणार असल्याचं बँकेने सांगितलंय.

कार लोन

एसबीआयची ही ऑफर किती दिवसांसाठी असेल याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे एसबीआयनंतर आता इतर बँकाही दरात कपात करण्याची शक्यता आहे. बँकेने सणउत्सवाच्या काळात कार लोनवर प्रोसेसिंग फी माफ केली आहे. किमान दरात ग्राहकांना कार लोन (SBI car loan) दिलं जाईल, ज्याची सुरुवात 8.70 टक्क्यांपासून होत आहे. यावर एस्केलेशन चार्जही नसेल, असं बँकेने सांगितलंय. एस्केलेशन चार्ज नसल्यामुळे ग्राहकांना दरात चढ-उतार पाहायला मिळणार नाही.

कार लोन घेण्यासाठी एसबीआयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म YONO किंवा वेबसाईटचा वापर केल्यास त्यांना व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्स (100bps=1%) चा अतिरिक्त लाभ मिळेल. पगारदारांसाठी कारच्या ऑन रोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येईल.

एसबीआयने नुकतीच एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉईंट्सने कपात केली होती, ज्यामुळे एप्रिलपासून ते 2019 पर्यंत आतापर्यंत गृहकर्जाच्या व्याजदरात 0.35 टक्क्यांनी कपात झाली आहे.

गृहकर्ज

सध्या एसबीआयचं गृहकर्ज (SBI Home loan interest rate) बाजारात सर्वात स्वस्त असल्याचं दिसून येतंय. 8.05 टक्क्यांनी रेपो लिंक्ड गृहकर्ज दिलं जात आहे.

एसबीआयचे नवे दर 1 सप्टेंबरपासून नव्या आणि जुन्या सर्व ग्राहकांसाठी लागू (SBI latest interest rates) होतील.

वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)

एसबीआयने वैयक्तिक कर्जासाठीही (SBI personal loan) मोठी सूट दिली आहे. 20 लाख रुपयांचं कर्ज 10.75 टक्के दराने उपलब्ध आहे. सहा वर्षांसाठी असलेल्या कर्जाचा दर जास्त आहे. यामुळे ग्राहकांवर ईएमआयचा भार कमी प्रमाणात पडेल.

एसबीआयच्या पगारदार खातेधारकांना अधिकची ऑफर

ज्या नोकरदारांचा पगार एसबीआयमध्ये होतो, त्यांना YONO च्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत पूर्व मान्य कर्ज मिळेल. एसबीआयचं शैक्षणिक कर्जही स्वस्त दरात उपलब्ध आहे. देश आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी 8.25 टक्क्यांपासून कर्ज घेता येईल. देशात शिक्षणासाठी 50 लाख रुपये आणि परदेशात शिकण्यासाठी 1.50 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. विशेष म्हणजे कर्जाच्या परताव्यासाठी विद्यार्थ्याला 15 वर्षांचा कालावधी दिला जाईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *