AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI च्या ग्राहकांना झटका, कर्ज दरात इतक्या टक्क्यांनी केली वाढ

स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 जूनपासून सर्व कार्यकाळांसाठी 10 बेस पॉईंट्स किंवा 0.1% ने कर्ज दरांची मार्जिनल कॉस्ट (MCLR) वाढवली आहे. SBI च्या या निर्णयामुळे MCLR शी संबंधित सर्व प्रकारच्या कर्जाचा EMI वाढणार आहे.

SBI च्या ग्राहकांना झटका, कर्ज दरात इतक्या टक्क्यांनी केली वाढ
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 15, 2024 | 9:01 PM
Share

अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सरकारी बँक SBI ने पुन्हा एकदा गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे जर तुम्ही जर एसबीआयकडून कर्ज घेतले असेल तर तुम्हाला तुमच्या गृहकर्जावर जास्त EMI भरावा लागणार आहे. SBI बँकेने कर्ज दराच्या मार्जिन कॉस्ट म्हणजेच MCLR दरात वाढ केली आहे. बँकेने वाढवलेला दर 15 जूनपासून देशभर लागू होणार आहे.

कर्ज किती महाग होईल?

SBI ने कर्ज दरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.1 टक्क्याने वाढ केली आहे. यामुळे MCAR शी संबंधित सर्व प्रकारच्या कर्जाचा EMI वाढणार आहे. यामुळे आता तुम्हाला दर महिन्याला कर्जावर पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. SBI च्या या वाढीमुळे 1 वर्षाचा MCLR 8.65% वरून 8.75% झाला आहे. MCAR 8% वरून 8.10% पर्यंत वाढला आहे. एक महिना आणि 3 महिन्यांचा MCLR 8.20% वरून 8.30% झाला आहे. जर आपण 6 महिन्यांचा कालावधी पाहिला तर, MCLR 8.55% वरून 8.65% पर्यंत वाढला आहे. जर आपण दीर्घ मुदतीचा विचार केला तर, 2 वर्षांचा MCLR 8.75% वरून 8.85% पर्यंत वाढला आहे आणि त्याच वेळी 3 वर्षांचा MCLR 8.85% वरून 8.95% पर्यंत वाढला आहे.

SBI ने शुक्रवारी माहिती दिली की त्यांनी व्यवसाय वाढीसाठी निधी बॉन्ड्समधून $ 100 दशलक्ष (सुमारे 830 कोटी रुपये) जमा केले आहेत. SBI ने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, हा निधी तीन वर्षांच्या मुदतीच्या वरिष्ठ असुरक्षित फ्लोटिंग रेट नोट्सच्या मदतीने आणि रेग्युलेशन-एस अंतर्गत तीन महिन्यांत देय असलेल्या सुरक्षित ओव्हरनाइट फायनान्सिंग दर +95 bps प्रति वर्षाच्या कूपनच्या मदतीने उभारण्यात आला आहे. त्यात त्यांनी हेही सांगितले की, हा बाँड एसबीआयच्या लंडन शाखेकडून 20 जून 2024 रोजी जारी केला जाईल.

गृह आणि वाहन कर्ज हे किरकोळ कर्जे एका वर्षाच्या MCLR दराशी जोडलेली आहेत. RBI रेपो रेट किंवा ट्रेझरी बिल उत्पन्न यांसारख्या बाह्य बेंचमार्कशी निगडीत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर MCLR मधील वाढीचा कोणताही परिणाम होत नाही. ऑक्टोबर 2019 पासून, SBI सह बँकांना या बाह्य बेंचमार्कशी नवीन कर्जे जोडणे अनिवार्य झाले आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…