Share Market Update: सेन्सेक्समध्ये 620 अंकांची उसळी, निफ्टी 17100 च्या वर बंद

Share Market Update: बुधवारच्या व्यवहारात इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि अॅक्सिस बँक सर्वाधिक वाढले, तर सिप्ला, डिव्हिस लॅब्स, डॉ. रेड्डीज लॅब्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्मा हे सर्वाधिक घसरले.

Share Market Update: सेन्सेक्समध्ये 620 अंकांची उसळी, निफ्टी 17100 च्या वर बंद
शेअर बाजार

मुंबई : बुधवारी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 619.92 अंकांच्या किंवा 1.09 टक्क्यांच्या वाढीसह 57,684.79 वर बंद झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 183.70 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 17,166.90 वर बंद झाला.

अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्मा हे सर्वाधिक घसरले

बुधवारच्या व्यवहारात इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि अॅक्सिस बँक सर्वाधिक वाढले, तर सिप्ला, डिव्हिस लॅब्स, डॉ. रेड्डीज लॅब्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्मा हे सर्वाधिक घसरले.

एका दिवसापूर्वी सेन्सेक्स 57,260.58 च्या पातळीवर बंद

तत्पूर्वी मंगळवारी बाजाराची सुरुवात वाढीसह झाली, परंतु दिवसभरातील प्रचंड अस्थिरतेमुळे बाजार लाल चिन्हावर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 195.71 अंकांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी घसरून 57064.87 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 81.40 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांनी घसरून 16972.60 च्या पातळीवर बंद झाला.

Tega Industries IPO: एका तासाच्या आत पूर्णपणे सबस्क्राइब केलेला इश्यू

तेगा इंडस्ट्रीजचा IPO बुधवारी सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आणि 3 डिसेंबर 2021 पर्यंत बोलीसाठी खुला असेल. तासाभरात आयपीओचं पूर्ण सबस्क्रिप्शन देण्यात आलं. कंपनीने या इश्यूमधून 619.23 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले. IPO पूर्णपणे OFS आहे.

आनंद राठी वेल्थचा IPO 2 डिसेंबरला उघडणार

आनंद राठी वेल्थ या मुंबईस्थित वित्तीय सेवा कंपनीचे युनिट आनंद राठीचा IPO 2 डिसेंबरला उघडणार आहे. कंपनीने 660 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 530-550 रुपये किंमत श्रेणी निश्चित केली. मंगळवारी ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, तीन दिवसांचा IPO 6 डिसेंबरला बंद होईल.

संबंधित बातम्या

ICICI बँकेने FD वरील व्याजदर बदलले, पटापट तपासा नवे दर

नोव्हेंबरमध्ये GST मधून कमाईचा नवा विक्रम, सरकारी खात्यात 131526 कोटी जमा

Published On - 6:53 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI