Sensex today: शेअर बाजारातील पडझड सुरुच, 5 दिवसात 3000 ने सेंसेक्स गडगडला

सलग पाचव्या दिवशीही शेअर बाजार पडझडीसह बंद झाला. जवळपास 30 शेअर्सचा इंडेक्स सेंसेक्स आज 535 अंकांनी पडला आणि 46874 वर बंद झाला.

Sensex today: शेअर बाजारातील पडझड सुरुच, 5 दिवसात 3000 ने सेंसेक्स गडगडला

मुंबई : आज (28 जानेवारी) सलग पाचव्या दिवशीही शेअर बाजार पडझडीसह बंद झाला. जवळपास 30 शेअर्सचा इंडेक्स सेंसेक्स आज 535 अंकांनी पडला आणि 46874 वर बंद झाला. या काळात सेन्सेक्सने 47172 च्या सर्वोच्च स्तरासोबतच 46518 च्या निच्चांकी स्तरालाही स्पर्श केला. 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 149 अंकांच्या पडझडीसह 13817 वर बंद झाला (Share market sensex sheds 3000 points in 5 days on 28 january).

सेंसेक्समध्ये आज अॅक्सिस बँक, एसबीआय, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर टॉप-5 गेनर्स राहिले. दुसरीकडे एचसीएल टेक, बजाज फायनान्शियल सर्विसेज, आयटीसी, इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर टॉप-5 लूजर्स ठरले. 20 जानेवारीला शेवटी शेअर बाजार वाढीसह बंद झाला होता तेव्हा BSE लिस्टेड कंपन्यांची टोटल मार्केट कॅप 189.91 लाख कोटी रुपये होती.

5 दिवसात बाजारात 3000 अंकांची पडझड

मागील 5 दिवसांमध्ये सेंसेक्समध्ये जवळपास 3000 अंकांची पडझड पाहायला मिळाली. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, FPI (Foreign portfolio investment) मुळे भारतीय शेअर बाजारात शेअर खरेदीदारांचा दबदबा होता. त्यांनी 50 हजारांच्या ऐतिहासिक आकड्यालाही गवसणी घातली. त्याच गुंतवणुकदारांच्या नफा वसुलीमुळे बाजारात पडझड सुरु आहे. सध्या बँक, रियल्टी, आयटी, फायनान्स आणि एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्यांवर जास्त परिणाम होताना दिसत आहे. ऑटो आणि ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये काही प्रमाणात वाढ दिसत आहे.

मारुतीच्या कमाईत भरभक्कम वाढ

मारुती सुझुकीने डिसेंबरच्या आपल्या तिमाहीची आकडेवारी जारी केलीय. याप्रमाणे वार्षिक आधारावर कंपनीचा निव्वळ नफा तिसऱ्या तिमाहीत 24 टक्क्यांनी वाढलाय. तो आता 1941 कोटी रुपये झालाय. त्यांच्या उत्पन्नात 13.3 टक्क्यांची वाढ झालीय. हे उत्पन्न 23 हजार 458 कोटी रुपये झालंय. मारुतीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एकूण 4 लाख 95 हजार 897 वाहनांची विक्री केलीय. हा आकडा डिसेंबर 2019 च्या तुलनेत 13.4 टक्के अधिक आहे.

हेही वाचा : 

गुंतवणुकदारांना बजेटची चिंता; शेअर बाजाराला मोठा झटका, सेन्सेक्सची मोठी घसरण

SBI ची जबरदस्त योजना; 5000 रुपयांपासून गुंतवणूक, एफडीचा दुप्पट नफा आणि 50 लाखांचा विमा मोफत

SBIची नवी योजना, एफडीतून मिळणार दुप्पट लाभ! 5 हजार रुपयांपासून करु शकता सुरुवात

व्हिडीओ पाहा :

Share market sensex sheds 3000 points in 5 days on 28 january

Published On - 7:55 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI