AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चांदीबाबत सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय; थेट आयातीवर… बाजारात मोठी खळबळ!

Silver Import Rule : सरकारने चांदीच्या अनेक श्रेणींना फ्री लिस्टमधून काढून रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीमध्ये टाकले आहे. याचा अर्थ आता या प्रकारच्या चांदीची आयात सोपी राहणार नाही.

मोठी बातमी! चांदीबाबत सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय; थेट आयातीवर... बाजारात मोठी खळबळ!
Silver RuleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 16, 2026 | 9:12 PM
Share

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोन्याच्या आयातीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतक आता चांदीच्या आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. सरकारने चांदीच्या अनेक श्रेणींना फ्री लिस्टमधून काढून रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीमध्ये टाकले आहे. याचा अर्थ आता या प्रकारच्या चांदीची आयात सोपी राहणार नाही आणि त्यासाठी आता अतिरिक्त परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. हा निर्णय देशातील मौल्यवान धातूंच्या वाढत्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोन्याऐवजी चांदी खरेदीकडे वाढता कल

सरकारने नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केलेले आहे, तसेच आयात कर वाढवल्याने सोन्याचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे लोक गुंतवणूक आणि दागिन्यांसाठी आता चांदीकडे अधिक वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच आता सरकारने चांदीच्या आयातीवरही कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी सोन्यावरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. त्यानंतर आता चांदीच्या आयातीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

परकीय चलन साठा वाचवण्यावर भर

जागतिक पातळीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकार सध्या परकीय चलन साठा सुरक्षित ठेवणे आणि रुपयावरील दबाव कमी करण्यावर भर देत आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे सरकार अधिक सतर्क झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, मौल्यवान धातूंची आयात सतत वाढत राहिल्यास चालू खाते तूट आणि व्यापार तूट दोन्ही वाढू शकतात. त्यामुळेच सरकार आयात नियंत्रणाद्वारे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे.

आयातीत घट

एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीची आयात जवळपास 30 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. वाढलेले आयात शुल्क आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किंमती यामुळे आयातीत घट झालेली आहे. आता नव्या निर्बंधांनंतर येत्या काही महिन्यांत चांदीच्या आयातीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात चांदीच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चांदी खरेदी करण्याची योजना असलेल्या खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द