AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

99 Pancakes : रस्त्यावर विकले लायटर तर 700 रुपयांवर केली नोकरी, फूडचेनमुळे इतक्या कोटींचा धनी

99 Pancakes : स्वप्नांचा पाठलाग केला तर कधी ना कधी यश खेचून आणता येतेच. काही लोक अशीच ध्येयवेडी असतात. कधी काळी रस्त्यावर लायर विक्री करणाऱ्या या तरुणाने आज तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

99 Pancakes : रस्त्यावर विकले लायटर तर 700 रुपयांवर केली नोकरी, फूडचेनमुळे इतक्या कोटींचा धनी
| Updated on: Jun 29, 2023 | 2:41 PM
Share

नवी दिल्ली : 99 पॅनकेक्स (99 Pancakes) हे नाव अनेकांना माहिती असेल. फुडी लोकांना तर आवर्जून हे नाव लक्षात असेल. एफएमसीजी सेक्टरमध्ये (FMCG) नाव कमावलेल्या 99 पॅनकेक्सने खवय्यांना पण बोटं चाटायला लावली आहेत. आता देशातील अनेक शहरात हा ब्रँड नावा रुपाला आला आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या तरुणाने हा ब्रँड सुरु केला. तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. हा ब्रँड सुरु करणाऱ्या तरुणाला हे यश लागलीच मिळाले नाही. त्याला त्यासाठी मोठा संघर्ष सहन करावा लागला. कधी काळी या तरुणाने रस्त्यावर लायटर पण विक्री केले आहे. तिथून हा प्रवास आज कोट्यवधींच्या घरात पोहचला आहे. त्याच्या मेहनतीने त्याने हे यश मिळवले आहे. तेव्हा तुम्ही पण तुमच्या स्वप्नांचा पाठलाग सोडू नकाच..

45 हून अधिक आऊटलेट देशभरात 99 पॅनकेक्सच्या 45 हून अधिक शाखा, आऊटलेट आहेत. सध्या हा ब्रँड 15 शहरांमध्ये आहे. 99 Pancakes आता मध्यपूर्व देशात धडक देणार आहे. हा ब्रँड आता देशाबाहेर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात पण हा ब्रँड खवय्यासाठी सुरु झाला आहे.

मुंबईत अवघ्या 700 रुपयांवर नोकरी 99 Pancakes ची सुरुवात विकेश शाह या तरुणाने केली आहे. अतिरिक्त पैसा गाठीशी असावा यासाठी त्याने एका छोट्या केक शॉपीवर कामाला सुरुवात केली होती. त्यांनी याठिकाणी सर्व गोष्टी शिकून घेतल्या. मेहनत केली. त्याला अवघा 700 रुपये महिना मिळत होता. दोनच वर्षात हा तरुण या केक शॉपीचा मॅनेजर झाला. त्यानंतर त्याने ही नोकरी सोडली. केटरिंग आणि इतर फूड व्यवसायात हात आजमावला.

सहा वर्षांपूर्वी 99 pancakes चा श्रीगणेशा विकेश शाह याने 2017 मध्ये 99 पॅनकेक्स नावाने कंपनीची सुरुवात केली. पण त्याअगोदर त्याने केलेला संघर्ष, घेतलेला अनुभव त्याच्यासाठी महत्वाचा ठरला. आज या कंपनीचा टर्नओव्हर, उलाढाल 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 1999 साली विकेशने एका बेकरी शॉपमध्ये उमेदवारी केली होती. मुंबईतील चर्चगेट येथील केक दुकानात काम केले. नोकरी करत त्याने शिक्षण पूर्ण केले. एवढेच नाही तर स्वतःची कंपनी स्थापन करण्याच्या स्वप्नाचा पाठलाग केला. हे स्वप्न पूर्ण केले.

संघर्षमय जीवन विकेश शाह याला जीवनात संघर्ष करावा लागला. अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या कराव्या लागल्या. मुंबईतील रस्त्यावर त्याने लायटर सुद्धा विक्री केले. मिळेल ते काम केले. त्याचे अनुभव गाठीशी बांधले. स्वतःचा केक, बेकरी व्यवसाय सुरु करण्याचे मनात आल्यावर, त्याने जुन्या बेकरी मालकाकडे ही योजना मांडली. त्यांच्याकडे मदत मागितली. चांगली कमाई सुरु झाल्यावर परत करण्याच्या बोलीवर त्याने किचनमधील सर्वच भांडे आणि सामान देऊन टाकले. त्यानंतर या व्यवसायाची पायाभरणी झाली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.