Sovereign Gold Bond Scheme :आजपासून प्रति 10 ग्रॅम 500 रुपये स्वस्त सोने खरेदीची संधी

सरकारने आरबीआयशी चर्चा करून ऑनलाईन अर्ज करणार्‍या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किमतीत 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याची परवानगी दिली. अशात गुंतवणूकदारांसाठी Sovereign Gold Bond ची इश्यू किंमत 4,741 रुपये प्रति ग्रॅम सोन्यासाठी असेल.

Sovereign Gold Bond Scheme :आजपासून प्रति 10 ग्रॅम 500 रुपये स्वस्त सोने खरेदीची संधी
Sovereign Gold Bond

नवी दिल्लीः SGB: आपण स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Sovereign Gold Bond योजना (SGB) 2021-22 – सीरिज VIII आजपासून 29 नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी खुली असेल. SGB च्या ताज्या हप्त्याची इश्यू किंमत 4,791 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आल्याची माहितीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी दिली.

विविध मार्गांनी Sovereign Gold Bond खरेदी करता येतो

एखादी व्यक्ती डिजिटलसह विविध मार्गांनी Sovereign Gold Bond खरेदी करू शकते. बाँड बँकांद्वारे (लहान वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) कडून विकले जातात.

ऑनलाईन खरेदीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट

सरकारने आरबीआयशी चर्चा करून ऑनलाईन अर्ज करणार्‍या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किमतीत 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याची परवानगी दिली. अशात गुंतवणूकदारांसाठी Sovereign Gold Bond ची इश्यू किंमत 4,741 रुपये प्रति ग्रॅम सोन्यासाठी असेल. हे बाँड खरेदी करताना एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 20,000 रुपये रोख पेमेंटच्या स्वरूपात देऊ शकते. डिमांड ड्राफ्ट किंवा चेक किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंगद्वारे पैसे भरण्याचा पर्यायही निवडता येईल. Sovereign Gold Bond चा कालावधी आठ वर्षांचा असेल. यासह पाचव्या वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे, जो पुढील व्याज भरण्याच्या तारखेला वापरला जाऊ शकतो. गुंतवणूकदारांना वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज मिळेल, जे वर्षातून दोनदा दिले जाईल.

2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली

Sovereign Gold Bond योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली. फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे आणि सोने खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या घरगुती बचतीचा भाग आर्थिक बचतीमध्ये बदलणे हा या योजनेचा उद्देश होता.

तुम्ही किती सोने खरेदी करू शकता?

एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करू शकते. यासह हिंदू अविभक्त कुटुंब किंवा HUF 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्था एप्रिल ते मार्च या कालावधीत प्रत्येक आर्थिक वर्षात 20 किलो गुंतवू शकतात. हे बाँड भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे जारी केले जातात. यासाठी सोन्याची किंमत बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन ऑफ इंडिया लिमिटेडने सदस्यत्व कालावधीच्या आधीच्या आठवड्याच्या शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांसाठी प्रकाशित केलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किमतीच्या सरासरीच्या बरोबरीची असेल.

संबंधित बातम्या

एक डिसेंबरपूर्वी फटाफट उरका ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’चा महत्त्वपूर्ण निर्णय; …तर होणार कारवाई

Published On - 10:23 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI