Special Story : यंदा राज्यात सोनं ‘भाव’ खाणार का? वाचा सध्याचा ट्रेंड

जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.

Special Story : यंदा राज्यात सोनं 'भाव' खाणार का? वाचा सध्याचा ट्रेंड
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 6:37 PM

मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या काळात सोन्याच्या दरांत वारंवार चढ-उतार झाल्याचं आपण पाहिलंच आहे. गेल्या वर्षा सोन्याचे दर बऱ्याच प्रमाणात घसरले. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही सोन्याच्या दरांमध्ये सतत घसरण होत होती. पण आता कोरोनाचा धोका कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. लसीकरण सुरू झाल्यामुळे नागरिकांनीही सुटकेचा श्वास घेतला. अशात आता सगळे व्यापार आणि व्यवसाय सुरू झाले आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा सोने व्यापारामध्ये दिसून येणार आहे. (special report 2021 gold silver price trend in maharashtra know how to check gold rate)

खरंतर, जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते. राज्यासह देशभरात सगळं काही पुन्हा एकदा सुरू झालं आहे. त्यामुळे कुठेतरी अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात सोनं गुंतवणुकीकडे लोकांची जास्त पसंती दिसून येईल.

राज्यात यंदा कसा असेल सोन्याचा ट्रेंड?

कोरोनावरील लसीकरण आणि देशभरात होणाऱ्या घडामोडींमुळे त्याचा सोने व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. या वर्षीही लसीकरणाच्या घडामोडींमुळे सोनं आणखी चमकण्याची शक्यता आहे. सगळे व्यापार आणि उद्योग नव्यानं उभारी घेत असल्यामुळे सोन्यालाही चांगलीच पसंती मिळेल असं मुंबईतल्या सराफा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. सोन्याच्या किंमती वारंवार घसरत असल्यामुळे तर गुंतवणूकदारांचीही यंदा दिवाळी असणार असंच म्हणायला हवं.

खरंतर, लॉकडाऊन काळात सोन्याची दुकानं बंद होती. त्यात सोन्याचा व्यापारही ठप्प होता. पण आता मोठ्या उत्साहात मार्केट सुरू झाली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या काळात अनेक लग्न सोहळे रद्द झाले. ते आता यंदा दणाक्यात होणार. यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे सोनं खरेदीला यंदा लोकांनी जास्त पसंती असणार आहे.

2021 मध्ये सोने-चांदीचे भाव वाढणार का?

सोने-चांदीच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोना लसीच्या बातम्यांमुळे याचे भाव उतरले आहेत, मात्र नववर्षात ते भाव पुन्हा वाढतील. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. यामुळे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोन्याच्या गुंतवणुकूमध्ये दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.

सोन्याचा भाव माहित असूद्या…

जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदीसाठी मार्केटमध्ये जात असाल तर सगळ्यात आधी चालू दिवसाचे सोन्या-चांदीचे भाव माहिती असूद्या. यासाठी तुम्ही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊ शकता. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचे भाव शोधायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाइटची मदत होईल. खरं सोनं हे 24 कॅरेटचंच असतं. पण याचा अद्याप कोणताही पुरावा नाहीये. कारण ते खूप मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ज्यामध्ये 91.66 टक्के सोनं असतं.

दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करा

तुम्ही दागिने विकत घेण्यासाठी गेला असाल तर हॉलमार्कसह दागिने घेतले आहेत ना याची खात्री करा. कारण, सोनं विकताना, हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या बाजारभावावर निश्चित केली जाते. म्हणून हॉलमार्कसह दागिने खरेदी करा. (special report 2021 gold silver price trend in maharashtra know how to check gold rate)

संबंधित बातम्या – 

शनिवार विशेष : 2020 मध्ये सोन्याच्या किंमती चमकल्या, यंदाही असाच राहणार ट्रेंड?

(special report 2021 gold silver price trend in maharashtra know how to check gold rate)

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.