पेन्शनशी संबंधित हा विशेष नियम 1 ऑक्टोबरपासून लागू, तुम्हाला काय फायदा?

पेन्शनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतील. उर्वरित पेन्शनधारक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतील

पेन्शनशी संबंधित हा विशेष नियम 1 ऑक्टोबरपासून लागू, तुम्हाला काय फायदा?

नवी दिल्लीः 1 ऑक्टोबर 2021 पासून पेन्शनचा विशेष नियम लागू होणार आहे. याचे पालन करणे आवश्यक असेल, अन्यथा पेन्शनचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. हा नवीन बदल डिजिटल हयातीच्या दाखल्याशी संबंधित आहे. आता हे प्रमाणपत्र जीवन प्रदान केंद्रात म्हणजेच देशातील सर्व मुख्य पोस्ट कार्यालयांच्या जेपीसीमध्ये जमा करता येईल. पेन्शनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, ते 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतील. उर्वरित पेन्शनधारक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतील.

हयातीचा दाखला सादर करण्याचे काम टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय डाक विभागाने जीवनप्रदान केंद्राचा आयडी आधीच बंद असेल तर वेळेवर कार्यान्वित होईल याची खात्री करण्यास सांगितले आहे. ज्या प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये जीवनप्रदान केंद्रे नाहीत, तेथे हे केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. सरकारच्या मते, जीवनप्रदान केंद्र बनवल्यानंतर आयडी सक्रिय करावे लागेल. हेच काम पोस्ट ऑफिसमधील कॉमन सर्व्हिस सेंटरसाठीही करावे लागते. त्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 ठेवण्यात आली.

डिजिटल हयातीचा दाखला

डिजिटल लाइफ सर्टिफिकेटचा नियम गेल्या वर्षीच लागू करण्यात आला. परंतु कोरोना महामारीमध्ये वृद्धांचे आरोग्य लक्षात घेऊन ते बंद करण्यात आले. सर्व केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला सादर करण्याची तारीख 1 नोव्हेंबर 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली. 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता आणि कोरोना महामारीपासून सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना 1 ऑक्टोबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची परवानगी देण्यात आली. या सूट कालावधीत निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे संपूर्ण पैसे सोडण्यात आले.

पेन्शनधारकांनी काय करावे?

हे काम पूर्णपणे ऑनलाईन झाले असल्याने पेन्शनधारकांना बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसला भेट देण्याची गरज भासणार नाही. लाइफ सर्टिफिकेट ऑनलाईन सबमिशन घरातून करता येते. यासाठी पेन्शनधारकाला डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अर्थात आधार क्रमांकावर बनवलेल्या DLC कडून जीवन प्रमाणपत्र घ्यावे लागेल. पूर्वी हे प्रमाणपत्र बँकांमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हाताने सादर करायचे होते. पण आता ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.
वास्तविक, ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेटमध्ये एक युनिक आयडी आढळतो जो डीएलसीचे काम पूर्ण होताच व्युत्पन्न होतो. या आधारावर हयातीच्या दाखल्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती आपोआप बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिस शाखेत पाठविली जाते. पेन्शनर अद्याप जिवंत आहे, या आधारावर पेन्शनरच्या खात्यात पैसे सोडले जातात.

डिजिटल हयातीच्या दाखल्याचे फायदे

वृद्ध पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. आता प्रमाणपत्र पाठवण्याचे काम घरी बसून केले जाईल आणि त्या आधारावर खात्यात पैसे येतील. दुसऱ्या नियमात, सरकारने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आधारला ऐच्छिक केले आहे. अनेक पेन्शनधारकांनी या प्रकरणात तक्रार केली होती की आधार कार्ड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पेन्शन मिळण्यात अडचण येत आहे किंवा त्यांच्या अंगठ्याचा ठसा जुळत नाही. काही सरकारी संस्थांनी 2018 मध्ये पर्यायी मार्ग स्वीकारला असताना, यासाठी डिजिटल हयातीच्या दाखल्यासाठी जारी करण्यासाठी आधार स्वेच्छिक केले गेलेय.

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरून दरमहा किती कमाई?; नितीन गडकरी म्हणतात…

कर वाचवण्यासाठी म्युच्युअल फंडाचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवू शकतो का? नियम काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI