AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणांच्या पार्श्वभूमीवर खर्चाला हातभार, बँका बंपर ऑफरसह क्रेडिट कार्ड करतायत लाँच

एसबीआय कार्ड आणि एचडीएफसी बँक यांसारख्या मार्केट लीडर व्यतिरिक्त, त्या बँकादेखील नवीन कार्ड लाँच करत आहेत. ज्यांनी आतापर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर केले नव्हते, आता त्या बँकाही नवीन उत्पादने घेऊन बाजारात दाखल होत आहेत. अनेक बँकर्स त्यांच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यांचा मोठा इतिहास आहे.

सणांच्या पार्श्वभूमीवर खर्चाला हातभार, बँका बंपर ऑफरसह क्रेडिट कार्ड करतायत लाँच
क्रेडिट कार्ड
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 7:43 AM
Share

नवी दिल्लीः Festive Season Shopping: फेस्टिव्ह सीझन तोंडावर आला असून, नवरात्र ते दसरा, दीपावली आणि भाई दूज दीड महिना किंवा सलग दोन महिने फक्त सणच सण आहेत. सण म्हणजे पूजा करणे, घर सजवणे, लोकांना भेटणे यासह भरपूर खरेदी करण्याची संधी असते. या सणासुदीच्या खरेदीसाठी बाजार सज्ज झालेत.

बँका नवीन ऑफर्स लाँच करतायत

ऑनलाईन शॉपिंग कंपन्या आणि बँका नवीन ऑफर्स लाँच करत आहेत, जेणेकरून या दसरा किंवा दिवाळीला तुमच्या खरेदीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. दीर्घकाळापर्यंत पसरलेल्या कोरोना महामारीनंतर या दिवाळीसंदर्भात सामान्य माणसासह बाजारपेठ आणि बँकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सणांचा हंगाम जवळ येताच बँका विविध प्रकारची नवीन क्रेडिट कार्ड लाँच करत आहेत. सणासुदीच्या खरेदीचा बोजा थेट तुमच्या खिशात पडू नये म्हणून बँका मोठ्या ऑफर्ससह क्रेडिट कार्ड सुरू करत आहेत.

आता त्या बँकाही नवीन उत्पादने घेऊन बाजारात दाखल

एसबीआय कार्ड आणि एचडीएफसी बँक यांसारख्या मार्केट लीडर व्यतिरिक्त, त्या बँकादेखील नवीन कार्ड लाँच करत आहेत. ज्यांनी आतापर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर केले नव्हते, आता त्या बँकाही नवीन उत्पादने घेऊन बाजारात दाखल होत आहेत. अनेक बँकर्स त्यांच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यांचा मोठा इतिहास आहे.

फेडरल बँकेचा क्रेडिट कार्ड व्यवसायात प्रवेश

कोचीच्या खासगी फेडरल बँकेने गेल्या महिन्यात क्रेडिट कार्ड व्यवसायाच्या जगात प्रवेश केला, तो कार्ड नेटवर्क ‘व्हिसा’ द्वारे आहे. काही दिवसांनंतर फेडरल बँकेने घरगुती कार्ड नेटवर्क RuPay सह नवीन क्रेडिट कार्ड सुरू केले. बँकांनी आपले लक्ष भारतातील तरुण लोकसंख्येकडे केंद्रित केले आणि तरुणांना क्रेडिट कार्डाशी जोडण्यासाठी नवीन उत्पादने सुरू केली जात आहेत. बँकांना असा विश्वास आहे की, आमचे तरुण भरमसाठ खर्च करतात. भारताचा तरुण जितका त्याच्या उत्पन्नाबाबत गंभीर आहे, तितका खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाही.

भारत पारंपरिकपणे डेबिट कार्डची बाजारपेठ

वित्तीय सल्लागार सेवा क्षेत्रातील दिग्गज पीडब्ल्यूसी इंडियाच्या मते, भारत पारंपरिकपणे डेबिट कार्डची बाजारपेठ आहे. गेल्या दशकात क्रेडिट कार्ड्सच्या वाढत्या मागणीमुळे ही वस्तुस्थिती बदलली. आता क्रेडिट कार्डचा मुक्तपणे वापर केला जात आहे. लोकांना क्रेडिट कार्डचे महत्त्व समजले आहे. वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सेवा आणि नवीन उत्पादने देत आहेत, यामुळे लोकांचा कलही क्रेडिट कार्डांकडे वाढलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, जुलैच्या अखेरीस देशातील क्रेडिट कार्डांची संख्या 63.4 दशलक्ष ओलांडली होती.

संबंधित बातम्या

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने घसरले, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा

पैसे कमवण्याची संधी! Oyo 8340 कोटींचा IPO आणतोय, जाणून घ्या तपशील

Spend grand on the backdrop of the festivities, with banks launching credit cards with bumper offers

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.