अरे देवा! बिटकॉइनच्या रुपात या व्यक्तीकडे आहेत 1800 कोटी, पण विसरला पासवर्ड

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Jan 27, 2021 | 1:51 PM

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणार्‍या थॉमसने 2011 मध्ये 7,002 बिटकॉइन घेतले होते. आज ते 245 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपयांच्या बरोबरीचे झाले आहे. पण स्वस्त:च्या मालकीचे पैसे असूनही स्टीफन ते काढू शकत नाही.

अरे देवा! बिटकॉइनच्या रुपात या व्यक्तीकडे आहेत 1800 कोटी, पण विसरला पासवर्ड

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेत राहणारे स्टीफन थॉमस यांची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर प्रकरणही तसंच आहे. हा सगळा मुद्दा आहे एका पासवर्डचा. जेव्हा क्रिप्टोकर्न्सीचे दर जास्त होते तेव्हा स्टीफन यांनी क्रिप्टोकर्न्सी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणार्‍या थॉमसने 2011 मध्ये 7,002 बिटकॉइन घेतले होते. आज ते 245 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपयांच्या बरोबरीचे झाले आहे. पण स्वस्त:च्या मालकीचे पैसे असूनही स्टीफन ते काढू शकत नाही. (Stefan Thomas made thousands crores from bitcoin now he forgot password viral news)

थॉमसने हे एन्क्रिप्शन डिव्हाइसमध्ये सर्व बिटकॉइन पासवर्डसह सेव्ह केले आहेत. पण आता झालं असं की तो याचा पासवर्ड विसरला आहे. थॉमसने आत्तापर्यंत 8 चुकीचे पासवर्ड टाकले आहेत. हार्ड ड्राइव्ह वापरकर्त्याला 10 वेळा पासवर्ड टाकण्याची संधी देते. त्यामुळे आता त्याच्याकडे फक्त 2 संध्या आहेत. केजीओ टीव्हीशी बोलताना स्टीफन म्हणाला की, पहिल्या आठवड्यामध्ये माझी प्रकृती खालावली. मी खूप तणावात होतो. पण आता या नुसकानीमुळे मला खूप त्रास होत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या थॉमस यांचा जन्म जर्मनीत झाला. यासगळ्याचा त्याला मानसिक त्रास होत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, थॉमस आपली कहाणी सांगून बर्‍यापैकी व्हायरल झाला आणि त्याला बरेच विचित्र सल्लेही मिळत आहेत. माझी समस्या दूर करण्यासाठी काही लोक मला भविष्य सांगणाऱ्यांकडे घेऊन जाण्याचा सल्ला देत होते.

इतकंच नाही तर स्फीनला एका व्यकीने यासाठी ड्रग्ज घेण्याचा सल्ला दिला जेणेकरून त्याला पासवर्ड आठवेल. या सगळ्याचा विचार करून मी चिंतेत होतो. पण आता मी काळानुसार शांत झाला आहे असंही त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं. (Stefan Thomas made thousands crores from bitcoin now he forgot password viral news)

संबंधित बातम्या – 

नवऱ्याच्या एका स्वप्नामुळे महिला रातोरात झाली करोडपती, 340 कोटींचा लागला बंपर जॅकपॉट

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

(Stefan Thomas made thousands crores from bitcoin now he forgot password viral news)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI