अजूनही दोन हजार रुपयांच्या इतक्या नोटा बँकेत आल्याच नाहीत, RBI ने दिली धक्कादायक आकडेवारी
दोन हजार रुपायांच्या गुलाबी नोटा चलनातून काढण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या नोटांना बँकेत भरण्यास लोकांना सांगण्यात आले होते. परंतू पावणे तीन वर्षे झाली तरी अजूनही इतक्या कोटी नोटांवर लोक बसून असल्याचे उघड झाले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने साल २०२३ मध्ये चलनातून बाद केलेल्या २००० रुपयांच्या (Rs 2000 Note) गुलाबी नोटा अजूनही संपूर्णपणे बँकेत परत आलेल्या नाही.साल २०२५ च्या अखेरपर्यंतचे आकडे आलेले आहेत. आरबीआयने सांगितले की अजूनही अजूनही ५००० कोटी रुपयांहून जास्त किंमतीच्या गुलाबी नोटा बँकेत परत येण्याची बाकी आहे. म्हणजे इतक्या किंमतीच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. खास बाब म्हणजे या नोटा रिटर्न करण्याची सुविधा असूनही लोकांद्वारे उशीर केला जात आहे.
आतापर्यंत ९८.४१ % गुलाबी नोटा परत आल्या
आरबीआयने २००० रुपयांच्या नोटासंदर्भात महत्वाची अपडेट जारी केली आहे. आरबीआय म्हणाले की २००० रुपयांच्या नोटा १९ मे २०२३ रोजी सर्क्युलेशनच्या बाहेर केल्या होत्या. या नोटा बँकेत परत करायच्या होत्या. परंतू आतापर्यंत सर्व नोटा बँकेत परत केलेल्या नाहीत. त्यावेळी बाजारात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. संपलेल्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ९८.४१ नोटांची बँकेत वापसी झाली आहे. अजूनही ५,६६९ कोटी रुपये मूल्यांच्या २००० रुपयांच्या नोटा बँकेत परत आलेल्या नाहीत.
दोन महिन्यात केवळ १४८ कोटी परत…
चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर आरबीआयने या नोटांना जमा करण्याची सुविधा दिली होती आणि सुरुवातीच्या काळात नोटापरत करण्याचा वेग खूप जास्त होता. परंतू आता हा वेग खूपच कमी झाला आहे. गेल्या दोन महिन्यातील आकड्यांवर नजर टाकली तर ३१ ऑक्टोबर रोजी बाजारातील या नोटांचा आकडा ५,८१७ कोटी रुपयांचा होता. म्हणजे अजूनही ५,६६९ कोटी रुपये लोक अजूनही स्वत: जवळ बाळगून आहेत. अशात या दोन महिन्यात केवळ १४८ कोटी रुपये किंमतीच्या नोटाच परत आल्या आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की या नोटा संपूर्णपणे बँकेत येईपर्यंत Rs 2000 Note संपूर्णपणे लिगल टेंडर असतील.
