KDMC Election 2026 : ऐन निवडणुकीत कल्याणमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जोरदार झटका, 1 ते 2 कोटी मागितल्याचा ठाकरे गटावर खळबळजनक आरोप
KDMC Election 2026 : सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी प्रचार सुरु केलेला असताना उद्धव ठाकरे गटाला आणि काँग्रेसला कल्याणमध्ये मोठा धक्का बसला आहे. महत्वाचं म्हणजे ठाकरे गटावर 1 ते 2 कोटी रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकींसाठी प्रचार सुरु झालेला आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून सगळ्याच पक्षात पक्षांतराचा सिलसिला सुरु आहे. आधी तिकीटांच्या आश्वासनावर पक्षांतर होत होती. आता ज्या पक्षात आहोत, तिथे तिकीट मिळालं नाही म्हणून रागापोटी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला जात आहे. असचं ठाण्यात घडलं आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक विजय काटकर कुटुंब यांनी शेकडो समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीही यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
“तिकीट वाटपात अन्याय झाला. निष्ठेला किंमत नाही, पैशालाच किंमत आहे. उमेदवारीसाठी ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी 1 ते 2 कोटींची मागणी केली” असा गंभीर आरोप विजय काटकर आणि त्याच्या मुलीने केला. ठाणे, कल्याण-डोंबिवली हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
1 ते 2 कोटी घेतल्याच्या आरोपावर उत्तर काय?
उपनेते विजय साळवी यांनी आरोप फेटाळला. “पैशांची मागणी केल्याचे दावे खोटे, राग-द्वेषातून केलेले आरोप. उमेदवारी देताना सर्व इच्छुकांशी चर्चा केली. जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपनेते यांच्या संयुक्त निर्णयानेच तिकीट वाटप झाल्याचा” विजय साळवी यांचा दावा
आरोपांमुळे डोकेदुखी वाढली
एकीकडे ठाकरे आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे 20 उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यात आता सुरू असलेली गळती आणि आरोपांमुळे डोकेदुखी वाढली आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेचा टिझर
छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 97 जागांवर लढत आहे आणि या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे दिनांक 10 तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा घेणार आहेत. मराठवाडा सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार असून त्याचा टिझर उबाठाकडून जारी करण्यात आला आहे.
