मार्चपासून ATM मधून मिळणार नाहीत 500 रुपयांच्या नोट?, सरकारने केले स्पष्ट
पाचशेच्या नोटांचे प्रमाण मार्च 2026 पासून एटीएममधून कमी करण्याचे काही संदेश सोशल मीडियाद्वारे व्हायरल केले जात आहेत. मात्र,या संदर्भात खरी माहिती सरकारने दिली आहे.

500 रुपयांच्या नोटासंदर्भात अलिकडे सर्वत्र चर्चा सुरु आहे.या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन निरनिराळे दावे केले जात आहेत. अनेकजण मार्च 2026 पासून 500 च्या नोटा एटीएममधून मिळणार नसल्याचा दावा केला जात आहे. अखेर हा प्रश्न का विचारला जात आहे. यात सत्यता किती आहे. सरकारच्या फॅक्ट चेक एजन्सी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. चला तर सरकारने या संदर्भात काय नेमके म्हटले आहे, हे पाहूयात…
वास्तविक सरकारने गेल्या वर्षी छोट्या नोटांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला होता. या संदर्भात बँकांना सांगितले की होती त्यांनी एटीएममध्ये छोट्या मुल्यांच्या नोटांची संख्या वाढवावी. सरकारचे म्हणणे होते की बँकांनी 100, 200 रुपयांसारख्या छोट्या मुल्यांच्या नोटांची संख्या एटीएममध्ये वाढविली पाहिजे. त्यानंतर या निर्णयाचे पालन देखील करण्यात आले. परंतू याचा अर्थ असा नव्हे की सरकारने 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याची तयारी चालविली आहे.
काय आहे सत्य स्थिती ?
सोशल मीडियावर या संदर्भात अफवा पसरु लागल्याने सरकारच्या फॅक्ट चेक एजन्सी यास स्पष्टपणे नकार दिला आहे. फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट केले आहे की हे जे सर्व सुरु आहे ते संपूर्णपणे निराधार आहे. सरकारची 500 रुपयांच्या नोटांना बंद करण्याची कोणतीही योजना नाहीए. तसेच या नोटांना एटीएममधून हटवण्याचाही कोणताही प्लान सरकारचा नाही.
येथे पाहा पोस्ट –
RBI to stop ₹500 notes from ATMs by March 2026❓🤔
Some social media posts claim that the Reserve Bank of India will discontinue the circulation of ₹500 notes by March 2026.#PIBFactCheck:
❌This claim is #fake!
✅ @RBI has made NO such announcement.
✅ ₹500 notes have… pic.twitter.com/F0Y3t0wHSf
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 2, 2026
500 रुपयांच्या नोट लिगल टेंडर
सरकारच्या फॅक्ट चेक एजन्सी PIB ने हे स्पष्ट केले आहे की 500 रुपयांच्या नोट अजूनही लिगल टेंडर आहे. म्हणजे त्यांचा वापर खरेदी आणि विक्री साठी संपूर्णपणे वैध आहे. सरकारने लोकांना अपिल केले आहे की सोशल मीडियावर सुरु असलेल्या अप्रमाणित आणि भ्रामक बातम्यांवर विश्वास ठेवू नका.कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिच्या अधिकृत सोर्सकडून त्याची खातरजमा करा. अशा प्रकारे पहिल्यांदाच सोशल मीडियातून 500 रुपयांच्या संदर्भात अफवा पसरलेली नाही. याआधीही अनेकदा नोटबंदी वा 500 रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे दावे केले जात आहेत.ज्यास सरकारने फेटाळून लावले आहे. जनूमध्येही PIB ने एक्सवर स्पष्ट केले होते की मार्च 2026 मध्ये कथित नोटबंदी संदर्भातील दावे पूर्णपणे असत्य आहेत आणि हा केवल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
