AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात मित्रांनी फक्त 10 हजार रूपयांत सुरू केली हाेती ‘ही’ कंपनी, आज आहे 1.32 लाखांचे बाजार मूल्य

1981 ची गोष्ट आहे, जेव्हा बंगळुरूमध्ये एकत्र काम करणाऱ्या 7 तरुण अभियंत्यांनी 10 हजार रुपयांच्या निधीतून ही कंपनी सुरू केली.

सात मित्रांनी फक्त 10 हजार रूपयांत सुरू केली हाेती 'ही' कंपनी, आज आहे 1.32 लाखांचे बाजार मूल्य
आयटी कंपनीImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 25, 2022 | 3:27 PM
Share

मुंबई,  कुठल्याही माेठ्या प्रवासाची सुरूवात ही पहिल्या पाऊलापासूनच हाेते. औद्याेगिक क्षेत्रात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांची सुरूवात अत्यंत साध्या आणि प्रतिकूल परिस्थीतीत झाली आहे, मात्र आज त्या अर्थव्यवस्थेचा कणा बनल्या आहेत. अशीच एक कंपनी जी 7 मित्रांनी  फक्त 10 हजार रुपयांमध्ये  सुरू केली ज्याचे आजच्या तारखेत बाजार मुल्य तब्बल 1.32 लाख कोटी आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस (Story Of Infosys), जी सुमारे चार दशकांपूर्वी सुरू झाली होती आणि तेव्हापासून कंपनीने अनेक टप्पे गाठले आहेत आणि आज ती देशातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे.

कशी झाली सुरूवात?

1981 ची गोष्ट आहे, जेव्हा बंगळुरूमध्ये एकत्र काम करणाऱ्या 7 तरुण अभियंत्यांनी 10 हजार रुपयांच्या निधीतून इन्फोसिस सुरू केली. हे सर्व सहकारी पटनी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काम करायचे आणि त्यांनी आयटी सर्वीस प्राेव्हाडर म्हणून या कंपनीचा पाया घातला. त्याच्या संस्थापकांमध्ये एनआर नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, एनएस राघवन, एस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल, के दिनेश आणि अशोक अरोरा यांचा समावेश होता.

नारायण मूर्ती यांनी पत्नीकडून कर्ज घेऊन सुरू केली कंपनी

इन्फोसिसच्या मुख्य संस्थापकांपैकी एक असलेल्या एनआर नारायण मूर्ती यांनी कंपनी सुरू करण्यासाठी पत्नी सुधा यांच्याकडून पैसे घेतले होते. अत्यंत मर्यादित संसाधनांसह सुरू झालेली ही कंपनी हळूहळू देशातील सर्वात यशस्वी IT कंपन्यांपैकी एक बनली. Patni Computer नावाची कंपनी, ज्यामध्ये तिचे संस्थापक काम करत होते, ती नंतर iGate Corp ने विकत घेतली आणि 2011 मध्ये Capgemini ने ती विकत घेतली.

दुसरीकडे, अननुभवी इन्फोसिस वर्षानुवर्षे यशाच्या पायऱ्या चढत राहिली. 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीचे बाजार भांडवल $16.3 अब्ज (सुमारे 1.32 लाख कोटी रुपये) वर पोहोचले, तर कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3.14 लाख झाली आहे.

जीडीपीमध्ये आयटी क्षेत्राचा 9 टक्के वाटा

आयटी उद्योगातील कंपनीला चार दशके पूर्ण झाल्याच्या आनंदात तिचे सह-संस्थापक आणि सीईओ सलील पारेख यांनी बुधवारी आयटी क्षेत्रातील भविष्यातील रणनीतींवर विचारमंथन केले. गेल्या आर्थिक वर्षात, भारताच्या IT क्षेत्राने GDP मध्ये 9 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे आणि देशाच्या एकूण सेवा निर्यातीत या क्षेत्राचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.