AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजलीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण! सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसचा परिणाम

Baba Ramdev | सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण यांना नोटीस बजावली. त्यांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. वैयक्तिकरित्या दोघांना हजर राहावे लागणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

पतंजलीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण! सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसचा परिणाम
बाबा रामदेव हाजीर होImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 19, 2024 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली | 19 March 2024 : योगगुरु रामदेव बाबा आणि त्यांची कंपनी पतंजलीला झटका बसला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरण पतजंलीवर शेकण्याची चिन्हं आहेत. याप्रकरणात बाबा रामदेव यांना दिलासा मिळण्याची चिन्हं नाहीत. पतंजलीचे आयुर्वेदीक उत्पादनं आणि उपचारासंबंधीच्या दाव्या संदर्भात जाहिरातीत जो काही दावा करण्यात आला आहे, त्याविरोधात अवमानाना कारवाई सुरु आहे. याप्रकरणात मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता योगगुरु रामदेव बाबा आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना व्यक्तिशः हजर राहाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ही वार्ता शेअर बाजारात येऊन धडकताच पंतजली फूड्सच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण दिसून आली.

नेमकं प्रकरण काय

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण अभियान आणि आधुनिक औषधीविरोधात मोहिम छेडल्याचा आरोप लावण्यात आला आहे. न्या.हिमा कोहली आणि न्य. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने कंपनी आणि बालकृष्ण यांच्याविरोधात यापूर्वी बजावलेल्या नोटीसला उत्तर न दिल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांच्याविरोधात अवमानना कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली. कोर्टाने आज रामदेव बाबा यांना नोटीस बजावत, त्यांच्याविरोधात अवमान केल्याप्रकरणात कार्यवाही का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली.

कंपनीच्या शेअरमध्ये घसरण

कोर्टाच्या आदेशानंतर पतंजली फुड्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. BSE च्या आकड्यांनुसार पतंजली फुड्सच्या शेअरमध्ये 3.15 टक्के म्हणजे जवळपास 44 रुपयांची घसरण दिसून आली. घसरणीसह हा शेअर 1372 रुपयांवर व्यापार करत आहे. तर व्यापारी सत्रात या शेअरने 1342.05 रुपयांचा निच्चांक पण गाठला. आज कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण होऊन तो 1410.10 रुपयांवर उघडला होता. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1416.60 रुपयांवर बंद झाला होता. आकड्यांनुसार कंपनीचे मूल्यांकन 50 हजार कोटी रुपयांनी घसरले. प्रकरणात आता पुढे काय होते, याकडे गुंतवणूकदार आणि ब्रोकर्सचे लक्ष लागले आहे. त्यानुसार, या शेअरमध्ये चढउताराचे सत्र दिसून येऊ शकते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल