आता Swiggy ड्रोनच्या मदतीने करणार सामानाची डिलिव्हरी, ‘असा ‘ आहे कंपनीचा भविष्यातील प्लॅन

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी आता सामानाच्या डिलिव्हरीसाठी ड्रोनचा उपयोग करणार आहे. सुरुवातीला बंगळुरू आणि दिल्लीमध्ये या प्रयोगाची चाचपणी होण्याची शक्यता आहे.

आता Swiggy ड्रोनच्या मदतीने करणार सामानाची डिलिव्हरी, 'असा ' आहे कंपनीचा भविष्यातील प्लॅन
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:09 PM

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) आता लवकरच सामानाच्या डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीच्या वतीने ब्लॉगवर देण्यात आली आहे. ग्राहकांना अधिक जलद गतीने सामानाची डिलिव्हरी पोहोचावी यासाठी इंस्टामार्ट (Instamart) पुढील महिन्यापासून देशातील काही भागांमध्ये ड्रोन (Drone) तंत्रज्ञानाचा उपयोग करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ड्रोनच्या मदतीने थेट घरापर्यंत होम डिलिव्हरी पोहोचवणे हे खूप कठीण आणि अडचणीचे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ ड्रोनच्या मदतीने फूड डिस्ट्रीब्यूशन सेंटरपर्यंतच सामान पोहोचवण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यत स्विगी या ड्रोनच्या मदतीने त्याच्या डिस्ट्रीब्यूशन सेंटरपर्यंत सामान पोहोचवणार आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन सेंटरमधून स्विगीचे कर्मचारी संबंधित सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील.

काय आहे स्विगीची योजना

कंपनी आपल्या व्यवसायामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करू इच्छिते. यासाठी कंपनीच्या वतीने ड्रोन तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी थेट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मात्र ते पहिल्या टप्प्यात शक्य नाही. त्यामध्ये अनेक अडणी येऊ शकतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन कंपनी सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या डिस्ट्रीब्यूशन सेंटरपर्यंत ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी पोहोचवणार आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन सेंटरमधील कर्मचारी सामानाची डिलिव्हरी संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील. म्हणजे तुम्हाला भविष्यात आकाशातून सामानाची ने-आण करणारे ड्रोन दिसतील मात्र सध्या तरी लगेचच हे ड्रोन तुमच्या दारात उतरणार नाहीत.

तीन कंपन्यांची निवड

सुरुवातीच्या टप्प्यात स्विगी आपल्या या पायलट प्रोजेक्टची सुरुवात बंगळूरू आणि दिल्लीमधून करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्विगीकडून या प्रोजेक्टसाठी गरुड एरोस्पेस, स्कायएअर मोबिलिटी आणि मारुत ड्रोनटेक या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सुरुवातीला गरुड एरोस्पेस ही बंगळुरूमध्ये तर स्कायएअर मोबिलिटी ही दिल्लीमध्ये स्विगीला सेवा पुरवणार आहे.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.