AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Semiconductor: भारत लवकरच सेमीकंडक्टरचा बादशाह! मोदींचा मास्टरस्ट्रोक… ॲडव्हॉन्स चिप आणि रोजगारच रोजगार

Tata Electronics Semiconductor: भारत हा जगातील सेमीकंडक्टर हब व्हावा यासाठी मोदी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जगातील अनेक नामवंत कंपन्यांसाठी पायघड्या अंथरण्यात आल्या आहेत. तर आता नेदरलँड दौऱ्यावर असताना जगातील एकमेव अत्याधुनिक चिप तयार करणारी कंपनी ASML करार झाला आहे. काय आहे अपडेट?

Semiconductor: भारत लवकरच सेमीकंडक्टरचा बादशाह! मोदींचा मास्टरस्ट्रोक... ॲडव्हॉन्स चिप आणि रोजगारच रोजगार
टाटा कंपनी, सेमीकंडक्टर, चिप निर्मिती Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 17, 2026 | 12:56 PM
Share

Tata Electronics Semiconductor: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि डच सेमीकंडक्टर उपकरण करणारी सर्वात मोठी कंपनी ASML ने भारतात चिप उत्पादन करण्यासंदर्भात करार केला आहे. या कराराची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेदरलँड दौऱ्यावर असताना केला आहे. ASML लिथोग्राफी उपकरणांच्या निर्मितीत दादा मानली जाते. अत्याधुनिक आणि छोट्या आकाराच्या सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती करणारी ही एकमेव कंपनी मानली जाते. या करारामुळे ASML गुजरात राज्यातील धोलेरा येथे टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत एक उत्पादन कारखाना सुरू करेल. इथे 300 mm (12 इंच) सेमीकंडक्टर फॅक्टरी सुरू करण्यात येईल. भारत आणि नेदरलँडमधील मैत्रीचे हे नवे पर्व मानण्यात येत आहे. यामुळे देशात रोजगार निर्मिती होईल आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मदत होईल.

टाटा कंपनी करणार 91 हजार कोटींची गुंतवणूक

टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारतात पहिला सेमीकंडक्टर वेफर फॅब्रिकेशन कारखाना सुरू करणार आहे. यासाठी 91,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. धोलेरा येथे अत्याधुनिक लिथोग्राफी उपकरणांआधारे चिप आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्यात येणार आहे. ASML च्या अत्याधुनिक तंत्रज्ञाना आधारे देशात पहिले व्यावसायिक 300 mm सेमीकंडक्टर उत्पादन करण्याचे निश्चित धोरण ठरवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होईलच. पण अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात येईल. त्यासाठी तरुणांना कौशल्य शिकता येईल. तर जगभरात भारतातून चिप आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा करता येईल.

ASML करेल टाटाला मदत

चिप उत्पादनात लिथोग्राफीला अत्यंत महत्त्व आहे. दोन्ही कंपन्या आरअँडडी साठी पायाभूत सुविधा विकसीत करतील. देशातील सेमीकंडकर इंडस्ट्रीसाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जाते. टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे CEO आणि MD, रणधीर ठाकुर हे या घडामोडीविषयी भरभरून बोलले. यामुळे जगभरात चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनात देशाचे नाव उंचावले आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल. नवीन कल्पनांना चालना मिळेल. तरुणांना रोजगार मिळेल असे मानले जाते आहे.

टाटा कंपनीचे उद्दिष्ट काय?

Tata Electronics च्या धोलेरा येथील कारखान्यात ऑटोमेटिव्ह, मोबाईल डिव्हाईस, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) आणि इतर प्रमुख क्षेत्रासाठी मदतीला येणारे सेमीकंडक्टर उत्पादन तयार करणे हे उद्दिष्ट आहे. यामाध्यमातून जगभरात चिप आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा करण्यात येईल. कंपनीने अगोदर PSMC (Powerchip Semiconductor Manufacturing Corporation, Taiwan) करार केला आहे. त्याआधारे कंपनी 28nm (नॅनोमीटर), 40nm, 55nm, 90nm आणि 110nm सारखी उत्पादनं बाजारात आणणार आहे.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा