ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ 3 बचत योजना सर्वोत्तम, कधी आणि कशी गुंतवणूक कराल?

जर कोणी वेळेत स्वतःसाठी बचत करू शकत नसल्यास 60 वर्षांवरील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना आहेत. ज्यात लोक वृद्धापकाळात एक निश्चित फंड गुंतवून त्याच्या व्याजाद्वारे स्वतःची काळजी घेऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' 3 बचत योजना सर्वोत्तम, कधी आणि कशी गुंतवणूक कराल?
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 1:53 PM

नवी दिल्लीः वाढत्या वयाबरोबर आपल्या आर्थिक सुरक्षेची चिंता सतावत असते. आजच्या काळात म्हातारपणासाठी बचत करणे खूप महत्त्वाचे झालेय. परंतु जर कोणी वेळेत स्वतःसाठी बचत करू शकत नसल्यास 60 वर्षांवरील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना आहेत. ज्यात लोक वृद्धापकाळात एक निश्चित फंड गुंतवून त्याच्या व्याजाद्वारे स्वतःची काळजी घेऊ शकतात. भारतातील कोणत्याही बचत योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ मिळतो. वृद्धांना डोळ्यासमोर ठेवून काही बचत योजना सुरू केल्यात.

विशेष 3 बचत योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष 3 बचत योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 60 वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत आपले खाते उघडू शकतात. जर एखाद्याचे वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने नोकरीतून व्हीआरएस घेतली असेल, तरीही कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

5 वर्षे मॅच्युरिटी कालावधी

पण त्याला निवृत्तीचा लाभ मिळाल्याच्या एका महिन्यात एससीएसएस योजनेंतर्गत खाते उघडावे लागेल. SCSS वर सध्याचा व्याजदर 7.4 टक्के वार्षिक आहे. एखादी व्यक्ती फक्त एकदाच यात गुंतवणूक करू शकते. यामध्ये तुम्ही 1000 ते 15 लाख रुपये जमा करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे.

आयकर सूट

मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर SCSS खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदाराला मिळणाऱ्या व्याजाची रक्कम वार्षिक 50 हजार रुपये होते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत सूट आहे.

मुदत ठेव (FD)

मुदत ठेव (FD) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्याजापेक्षा काही टक्के गुण अधिक मिळतात. आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने ही योजना वृद्धांसाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकते. सध्या SBI मध्ये FD चे व्याजदर वेगवेगळ्या कालावधीनुसार निश्चित केले जातात. FD वर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 6.20 टक्के आहे. वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदराचे विश्लेषण करून तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम FD पर्याय निवडू शकता. ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या FD मधून 50000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर नाही.

पंतप्रधान वय वंदना योजना

सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) सुरू केली आहे. कोणताही ज्येष्ठ नागरिक 31 मार्च 2023 पर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतो. वृद्धांसाठी ही पेन्शन योजना आहे. त्याचे ऑपरेशन एलआयसीकडे आहे. या योजनेत कमाल गुंतवणूक मर्यादा 15 लाख रुपये आहे आणि त्याची मुदत 10 वर्षे आहे.

तर गुंतवणुकीची रक्कम पेन्शनच्या शेवटच्या हप्त्यासह परत मिळते

10 वर्षांनंतर जर गुंतवणूकदार जिवंत असेल, तर गुंतवणुकीची रक्कम पेन्शनच्या शेवटच्या हप्त्यासह परत मिळते. जर 10 वर्षांच्या आत एखाद्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर नामांकित व्यक्तीला गुंतवणुकीचे पैसे मिळतात. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी गुंतवणुकीवर 7.40 टक्के व्याज मिळेल. मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक कोणत्याही आधारावर पेन्शन घेता येते.

संबंधित बातम्या

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवे नियम 30 सप्टेंबरपासून लागू, ..तर खाते बंद होणार

कोरोनाच्या संकटात नोकरी गमावली, तर हा व्यवसाय सुरू करा आणि दरमहा 10 लाख कमवा

The best, when and how to invest in these 3 savings plans for senior citizens?

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.