AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistani Brand : कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांची धमाल! जगभरात आज पण डिमांड, तुमच्या घरात पण असेल हा ब्रँड

Pakistani Brand : कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांना आजही जगभरात मागणी आहे. त्यातील एक ब्रँड तर आता उन्हाळ्यात भारतातही खूप चालतो. तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये हा ब्रँड सहज उपलब्ध दिसेल...

Pakistani Brand : कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांची धमाल! जगभरात आज पण डिमांड, तुमच्या घरात पण असेल हा ब्रँड
| Updated on: May 10, 2023 | 10:23 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानची अवस्था आज ‘ना घरा का ना घाट का’ अशी झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालता घालता या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कडेलोट व्हायला आला आहे. येथील राज्यकर्त्यांनी जनेतला भूकेकंगाल करुन सोडले आहे. आशिया खंडातील सर्वाधिक महागाई दर पाकिस्तानचा (Pakistan)आहे. येथील वस्तूंच्या किंमतीत गगनाला भिडल्या आहेत. हा देश श्रीलंकेच्या वाटेवर निघाला आहे. पण या देशाच्या काहा ब्रँड्सची आजही जागतिक बाजारात चलती आहे. या ब्रँड्सची भूरळ आजही कायम आहे. कंगाल पाकिस्तानच्या या उत्पादनांना (Pakistan Brands) आजही जगभरात मागणी आहे. त्यातील एक ब्रँड तर आता उन्हाळ्यात भारतातही खूप चालतो. तुम्हाला कोणत्याही मॉलमध्ये हा ब्रँड सहज उपलब्ध दिसेल.

इतका महागाई दर पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. गव्हाच्या पीठासाठी लोकांना कित्येक तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मध्यमवर्गापेक्षा गरीबांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शहबाज शरीफ सरकारने महागाईपुढे गुडघे टेकवले आहे. पाकिस्तानमध्ये आशियातील सर्वाधिक महागाई आहे. या देशात महागाई दर (Inflation Rate) 36.4 टक्के इतका आहे. हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.

हे ब्रँड लोकप्रिय तर अशा ही परिस्थितीत पाकिस्तानच्या काही ब्रँड्सने जागतिक बाजारपेठांमध्ये मांड ठोकलेली आहे. या ब्रँड्स सर्वांनाच भूरळ पडली आहे. आपल्या नकळत आपण या ब्रँड्सला घरात ही आश्रय दिला आहे. त्यातील काही ब्रँड्स तुम्हाला सहज कोणत्याही मॉलमध्ये दिसतील.

रुह अफजा रुह अफजा (Rooh Afza) हा ब्रँड तुम्ही घरी पण आणला असेल. याचे उत्पादन पाकिस्तानात होते. या ब्रँडची भारतासह जगात मागणी आहे. रुह अफजा ब्रँडचा व्यवसाय जगभरातील जवळपास 33 देशांमध्ये आहे. पाकिस्तानची ही उत्पादने जगभरात लोकप्रिय आहेत.

Bar.B.Q Tonight स्वादिष्ट जेवणासह हलक्याफुलक्या नाष्ट्यासाठी Bar.B.Q Tonight हा पाकिस्तानी ब्रँड जगभरात फेमस आहे. याच्या शाखा अनेक देशांमध्ये आहे. या ब्रँडची लाल किला रेस्टॉरंटची चेन ही लोकप्रिय आहे. या ब्रँडच्या शाखा दुबई, ओमान, मलेशियापासून सिंगापूर दरम्यानच्या सगळ्याच देशात आहे.

Pakola पाकिस्तानचे कार्बोनेटेड ड्रिंक ब्राँड Pakola हे लोकप्रिय पेय आहे. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा आणि ब्रिटेनमध्ये हा ब्रँड लोकप्रिय आहे. उन्हाळ्यासह इतर ऋतूतही हा ब्रँड फेमस आहे.

Student Biryani 1969 मध्ये केवळ एका छोट्या स्टॉलमध्ये स्टूडंट बिर्यानीची सुरुवात झाली होती. आज हा ब्रँड जागतिक बाजारात सर्वात लोकप्रिय आहे. स्टूंडट बिर्याणी तिच्या स्वादिष्ट चवीसाठी ओळखल्या जाते. हैदराबाद बिर्याणीसारखीच या ब्रँडची खास चव आहे. जगभरात या ब्रँडच्या शाखा आहेत.

Khaadi Brand खादी ब्रँडने पण ब्रँडेड कपड्यांच्या बाजारात आपला शिक्का चालविला आहे. या ब्रँडचे शोरुम जगभरात उघडण्यात आले आहेत. युएई, अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनाडा सारख्या देशात हा ब्रँड खूप लोकप्रिय आहे.

जुनैद जमशेद जुनैद जमशेदवर ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडतात. हा वस्त्रदालनातील हटके ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटेन, कॅनाडा, अमेरिकेसह अनेक देशात या ब्रँडची वस्त्रदालन आहेत. फॅशनेबल कपड्यांच्या बाजारात, आमिर अदनान, चेन वन आणि गुल अहमद ब्रँडची पण चलती आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.