Petrol Diesel Price Today : महागाईत मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेलचा भाव होणार कमी?

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. कच्चा तेलाही त्यापासून अलिप्त नाही. कच्चा तेलाच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे. महागाईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती तुम्हाला दिलासा देतील का

Petrol Diesel Price Today : महागाईत मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेलचा भाव होणार कमी?
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 8:46 AM

नवी दिल्ली : अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहे. अमेरिकेच्या दोन मोठ्या बँकांना ताळे लागले आहे. तर तिसरी बँक रांगेत आहे. एवढेच नाही तर महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक वाढीव व्याज दर लादणार आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. त्यात कच्चा तेलाचाही समावेश आहे. कच्चा तेलाच्या भावात (Crude Oil Price) सातत्याने चढउतार होत आहे. भारताने अमेरिकेकडून आयात होणाऱ्या कच्चा तेलात कपात केली आहे. रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल, तेही स्वस्तात आयात करण्यात येत आहे. त्याचा फायदा भारताला होत आहे. आता नागरिकांना या बदलत्या किंमतींचा कधी फायदा मिळतो, हे लवकरच समोर येईल. पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) कमी होण्याची नागरिकांची मागणी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज, 16 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) घसरुन 68.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 74.91 डॉलर प्रति बॅरल आहे. आज, या किंमतींच्या आधारे भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले.

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. हे सुद्धा वाचा
  4. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  5. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  6. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  7. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  8. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  9. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  10. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  11. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.