Rail Bogies : औरंगाबादेत रेल्वे बोगीचा मेगा प्रोजेक्ट, या कंपनीने पूर्ण केली तयारी..उद्योगांच्या पळवापळीत मोठी बातमी..

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 11, 2022 | 2:49 PM

Rail Bogies : लातूर येथे रेल्वे कोच तयार करण्याचा कारखाना सुरु झाल्यानंतर मराठवाड्यासाठी आणखी एक चांगली बातमी आहे..

Rail Bogies : औरंगाबादेत रेल्वे बोगीचा मेगा प्रोजेक्ट, या कंपनीने पूर्ण केली तयारी..उद्योगांच्या पळवापळीत मोठी बातमी..
रेल्वे बोगी कारखाना
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : राज्यातून मोठे उद्योग (Big Industries) गुजरातला पळविण्यात येत असल्याचा मुद्या विरोधकांनी उचलून धरला आहे. राज्यात त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांत घमासान सुरु असतानच मराठवाड्यासाठी (Marathwada)आणखी एक चांगली बातमी येऊन धडकली आहे. लातूरमध्ये रेल्वे कोच (Latur Rail Coach) तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला असतानाच आता औरंगाबाद (Aurangabad) ही रेल्वेच्या नकाशावर आले आहे.

या घडामोडीदरम्यान सीमेन्स (Siemens) या आघाडीच्या कंपनीने दिलासादायक बातमी दिली आहे. आशिया खंडातील मोठी औद्योगिक नगरी औरंगाबाद येथे रेल्वे बोगीचा (Rail Bogies) मोठा प्रकल्प सुरु करण्याची घोषणा कंपनीने गेली आहे.

या रेल्वे बोगी प्रकल्पाचा उद्देश आणि हा प्रकल्प औरंगाबादलाच का सुरु करण्यात येत आहे, याचा खुलासाही कंपनीने केला आहे. जागतिक आणि देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प कंपनीने हाती घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

सीमेन्स लिमिटेडने औरंगाबादेत रेल्वे बोगीचा कारखाना सुरु करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. लवकरच हा कारखाना सुरु करण्यात येईल. देशातील आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

औरंगाबादचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, रेल्वे बोगाचा कारखाना उभारण्यात येत आहे. या कारखान्यातून परदेशात 200 रेल्वे बोगी निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीने याविषयीची घोषणा केली आहे.

या प्रकल्पातून तयार होणाऱ्या रेल्वे बोगीचं खास डिझाईन असेल. या बोगी रेल्वे प्रवास आरामदायी करण्याचा अनुभव देतील. तसेच देखरेखीसाठी आणि दुरुस्तीसाठी या बोगी सोप्या असतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सीमेन्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल माथूर(Sunil Mathur) यांनी औरंगाबाद हे स्थान या प्रकल्पासाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले. येथील कारखान्यात, पॅसेंजर कोच (passenger coaches) , लोकोमोटिव्ह (locomotives), इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स (electric multiple units) ट्राम (trams) आणि मेट्रोची (metros) निर्मिती होणार आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI