ITC Share : अगोदर उडवली खिल्ली, तोच ठरला मार्केटमधली खली! या शेअरने घेतली रॉकेट भरारी

ITC Share News : ITC शेअरची बाजारात मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली होती. पण आता या शेअरने या सगळ्या टीकेला दमदार कामगिरीने उत्तर दिले आहे.

ITC Share : अगोदर उडवली खिल्ली, तोच ठरला मार्केटमधली खली! या शेअरने घेतली रॉकेट भरारी
ITC शेअरची भरारीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:09 PM

ITC Share Price: आयटीसी(ITC Share) शेअरने बाजारात (Stock Market) कमाल केली. आतापर्यंत या शेअरवर टीकेचा भडीमार झालाच नाही तर त्याची भरपूर खिल्ली ही उडवण्यात आली होती. बाजारातच नव्हे तर सोशल मीडियावर तर आयटीसीच्या स्टॉक्सची यथेच्छ धुलाई करण्यात आली होती. ट्विट आणि व्हॉट्सअपवर मीम्स (Mims) तयार करुन आयटीसी शेअरची टिंगलटवाळी करण्यात आली. अनेक गुंतवणूकदारांनी या स्टॉकपासून चार हात दूर राहणे पसंत केले. पण शेवटी या सर्व अपमानाचा बदला या स्टॉकने उत्तम आणि दमदार कामगिरीतून घेतला. या शेअरने चमकदार कामगिरी करत शेअर बाजारातील टॉप 10 (Top 10) मध्ये पुन्हा आपलं स्थान मिळवलंच नाही तर बळकट केलं. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. गुंतवणूकदारांना कंपनीने जबरदस्त परतावा (Good Return) दिला आहे. तर ज्यांनी आयटीसीमध्ये गुंतवणूक केली नाही त्यांना मनस्ताप झाला आहे. सिगरेट उत्पादनापासून ते हॉटेल उद्योगापर्यंत कंपनीचे जाळे विस्तारले आहे.

भारताची 10वी सर्वात मोठी कंपनी

बीएसई वर सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपनुसार,आईटीसी कंपनी भारतातील 10वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. भारती एअरटेल, बजाज फाइनेंस, अडानी ग्रीन एनर्जी सारखे दिग्गज कंपन्यांना पछाडत कंपनीने हा गौरव मिळवला आहे. सोमवारी मार्केट बंद झाले तेव्हा, या शेअरने 3,63,907 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह दहावे स्थान पटकावले. आईटीसी 52 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर म्हणजे 296.95 रुपयांवर पोहचला असून तो लवकरच 300 रुपयांचे लक्ष्य गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा शेअर पुन्हा भरारी घेईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. येत्या काही काळात हा शेअर दमदार कामगिरी करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कंपनी काय करते?

ITC ही कोलकाता स्थित कंपनी आहे. हा ग्रुप हॉटेल, गैर-सिगरेट एफएमसीजी वस्तू, कागद, स्टेशनरी, कृषी आणि आयटी तसेच इतर क्षेत्रात सक्रिय आहे. हा शेअर सध्या मार्केटमध्ये नाव कमावत आहे. बाजारातील तज्ज्ञ हा शेअर मैदान गाजवेल असा दावा करत असून या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत आहे. हा स्टॉक बुलिश असल्याचा दावा करण्यात येत आहे. या स्टॉकचे विश्लेषण करणा-या 30 पैकी 21 फर्मने या कंपनीला ग्रीन सिग्नला दिला आहे. तसेच हा स्टॉक रॉकेट ठरेल असे संकेत दिले आहे. विश्लेषकांच्या दाव्यानुसार, हा शेअर 351 रुपयांचा टार्गेट प्राईस सहज साध्य करेल, लक्ष्य गाठेल असा दावा करण्यात येत आहे. आयटीसी अद्यापही ईएसजी फंडापासून दूर आहे कारण सिगरेटमधूनच ही कंपनी जवळपास 80 टक्के कमाई करते.

हे सुद्धा वाचा

विशेष सूचना : हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी त्यांचा विवेक शाबूत ठेऊन गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा. बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.